मुंबई - आरोग्य विभागाने केलेल्या उपाययोजनांमुळे राज्यात गेल्या वर्षीच्या मार्चपासून सुरू झालेला कोरोनाचा प्रसार काही प्रमाणात कमी झाला होता. मात्र, लोकल ट्रेन आणि इतर गर्दीमुळे रुग्णसंख्या वाढू लागली आहे. 14 फेब्रुवारीला 4092, 15 फेब्रुवारीला 3365, 16 फेब्रुवारीला 3663, 17 फेब्रुवारीला 4787 रुग्ण आढळून आले होते. आज 5427 नवे रुग्ण आढळून आले आहेत. गेल्या दोन दिवसात रुग्णांच्या आणि मृत्यूच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झालेली पाहायला मिळत आहे.
हेही वाचा -अभिनेत्यांबद्दल बोललं की आपसूकच प्रसिद्धी मिळते; देवेंद्र फडणवीसांचा नाना पटोले यांना टोला
5427 नवीन रुग्ण -
आज राज्यात 5427 नवीन कोरोना रुग्णांचे निदान झाले आहे. यामुळे राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 20 लाख 81 हजार 520 वर पोहचला आहे. तर आज 38 रुग्णांचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा 51 हजार 669 वर पोहचला आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचा दर 95.5 टक्के तर मृत्यूदर 2.48 टक्के आहे. राज्यात आज 2543 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचा आकडा 19 लाख 87 हजार 804 वर पोहचला आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 1 कोटी 55 लाख 21 हजार 198 नमुन्यांपैकी 20 लाख 81 हजार 520 नमुने म्हणजेच 13.41 टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात सध्या 2 लाख 16 हजार 908 व्यक्ती होम क्वारंटाइनमध्ये असून 40 हजार 858 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत, अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.
हेही वाचा -शेतकऱ्याचा यशस्वी प्रयोग, कोकणाच्या लाल मातीत उगवली स्ट्रॉबेरी; मिळवतोय चांगले उत्पन्न