महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

राज्यात कोरोना रुग्णसंख्या वाढली, बुधवारी 4878 नवीन रुग्ण - corona patients hike

आज राज्यात 4787 नवीन कोरोना रुग्णांचे निदान झाले आहे. यामुळे राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 20 लाख 76 हजार 093 वर पोहचला आहे. तर आज 40 रुग्णांचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा 51 हजार 631 वर पोहचला आहे.

corona
कोरोना

By

Published : Feb 17, 2021, 9:21 PM IST

मुंबई - आरोग्य विभागाने केलेल्या उपाययोजनांमुळे राज्यात गेल्या वर्षीच्या मार्चपासून सुरू झालेला कोरोनाचा प्रसार काही प्रमाणात कमी झाला होता. मात्र लोकल ट्रेन आणि इतर गर्दीमुळे रुग्णसंख्या वाढू लागली आहे. 14 फेब्रुवारीला 4092, 15 फेब्रुवारीला 3365, 16 फेब्रुवारीला 3663 रुग्ण आढळून आले होते. आज 4787 कोरोनाचे नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 40 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच आज मृत्यूच्या संख्येतही वाढ झाल्याचे दिसून येत आहे.

4787 नवीन रुग्ण -

आज राज्यात 4787 नवीन कोरोना रुग्णांचे निदान झाले आहे. यामुळे राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 20 लाख 76 हजार 093 वर पोहचला आहे. तर आज 40 रुग्णांचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा 51 हजार 631 वर पोहचला आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचा दर 95.62 टक्के तर मृत्यूदर 2.49 टक्के आहे. राज्यात आज 3853 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचा आकडा 19 लाख 85 हजार 261 वर पोहचला आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 1 कोटी 54 लाख 55 हजार 268 नमुन्यांपैकी 20 लाख 76 हजार 093 नमुने म्हणजेच 13.43 टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात सध्या 1 लाख 95 हजार 704 व्यक्ती होम क्वारंटाइनमध्ये असून 38 हजार 013 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत, अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.

रुग्ण संख्या वाढली -

राज्यात दोन महिन्यानंतर पुन्हा रुग्णसंख्या वाढली आहे. राज्यात 11 डिसेंबरला 4268, 12 डिसेंबरला 4269, 16 डिसेंबरला 4304 रुग्ण आढळून आले होते. त्यानंतर यात घट होऊन 2 ते 3 हजाराच्या आसपास रुग्ण आढळून येत होते. 14 फेब्रुवारीला 4092, 15 फेब्रुवारीला 3365, 16 फेब्रुवारीला 3663 रुग्ण आढळून आले होते. आज 4787 रुग्ण आढळून आले आहेत.

या दिवशी सर्वात कमी रुग्णांची नोंद -

राज्यात गेल्या दहा महिन्यापासून कोरोनाचा प्रादुर्भाव आहे. या कालावधीत राज्यात 15 नोव्हेंबरला 2 हजार 544, 18 जानेवारीला 1 हजार 924 तर 25 जानेवारीला 1 हजार 842 इतके सर्वात कमी रुग्ण आढळून आले आहेत.

आज या विभागात सर्वाधिक रुग्ण-

मुंबई पालिका - 721
नागपूर पालिका - 453
पुणे पालिका - 443
अमरावती पालिका - 392
अमरावती - 230
पिंपरी चिंचवड - 223
पुणे - 198
नाशिक पालिका - 159
कल्याण डोंबिवली पालिका - 131
ठाणे पालिका - 113
अकोला पालिका - 105
बुलढाणा - 102

ABOUT THE AUTHOR

...view details