मुंबई -आज राज्यात 3670 नवीन कोरोना रुग्णांचे निदान झाले आहे. यामुळे राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 20 लाख 56 हजार 575 वर पोहचला आहे. तर आज 36 रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. त्यामुळे आतापर्यंत एकूण मृतांचा आकडा 51 हजार 451 वर पोहचला आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचा दर 95.91 टक्के तर मृत्यूदर 2.5 टक्के आहे, अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.
आज 2422 रुग्णांना डिस्चार्ज-
राज्यात आज 2422 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचा आकडा 19 लाख 72 हजार 475 वर पोहचला आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 1 कोटी 52 लाख 19 हजार 416 नमुन्यांपैकी 20 लाख 56 हजार 575 नमुने म्हणजेच 13.51 टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात सध्या 1 लाख 68 हजार 087 व्यक्ती होम क्वारंटाइनमध्ये असून 31 हजार 474 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.
या दिवशी सर्वात कमी रुग्णांची नोंद -
राज्यात गेल्या दहा महिन्यापासून कोरोनाचा प्रादुर्भाव आहे. या कालावधीत राज्यात 15 नोव्हेंबरला 2 हजार 544, 18 जानेवारीला 1 हजार 924 तर 25 जानेवारीला 1 हजार 842 इतके सर्वात कमी रुग्ण आढळून आले आहेत.