महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

राज्यात 2992 नवीन कोरोनाबाधित; 30 रुग्णांचा मृत्यू - महाराष्ट्र कोरोना लेटेस्ट न्यूज

राज्यात 2992 नवीन कोरोना रुग्णांचे निदान झाले आहे. यामुळे राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 20 लाख 33 हजार 166 वर पोहचला आहे. तर आज 30 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

corona
corona

By

Published : Feb 3, 2021, 8:29 PM IST

मुंबई - आज राज्यात 2992 नवीन कोरोना रुग्णांचे निदान झाले आहे. यामुळे राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 20 लाख 33 हजार 166 वर पोहचला आहे. तर आज 30 रुग्णांचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा 51 हजार 169 वर पोहचला आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचा दर 95.58 टक्के तर मृत्यूदर 2.52 टक्के आहे, अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.

हेही वाचा -महाविकास आघाडी सरकार 5 वर्ष पूर्ण करणार - खडसे

37 हजार 516 अ‌ॅक्टिव्ह रुग्ण -

राज्यात आज 7030 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचा आकडा 19 लाख 43 हजार 335 वर पोहचला आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 1 कोटी 47 लाख 64 हजार 744 नमुन्यांपैकी 20 लाख 33 हजार 266 नमुने म्हणजेच 13.77 टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात सध्या 1 लाख 82 हजार 181 व्यक्ती होम क्वारंटाइनमध्ये असून 37 हजार 516 अ‌ॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

हेही वाचा -'बाळासाहेब ठाकरेंमुळेच सेनेला कोकणात मतं मिळतात; उद्धव ठाकरेंमुळे नाही'

या दिवशी सर्वात कमी रुग्णांची नोंद -

राज्यात गेल्या दहा महिन्यापासून कोरोनाचा प्रादुर्भाव आहे. या कालावधीत राज्यात 15 नोव्हेंबरला 2 हजार 544, 18 जानेवारीला 1 हजार 924 तर 25 जानेवारीला 1 हजार 842 इतके सर्वात कमी रुग्ण आढळून आले आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details