मुंबई - दिवसेंदिवस मुंबईत कोरोनाग्रस्तांची संख्या वाढतच आहे. मुंबईत आज (शनिवार) नवे 1 हजार 566 रुग्ण आढळून आले. त्यामुळे मुंबईमधील कोरोनाग्रस्तांचा आकडा 28 हजार 634 वर पोहोचला आहे. तर मुंबईत झालेल्या 40 मृत्यूंमुळे मृतांचा आकडा 949 वर पोहोचला आहे. मुंबईमधून 396 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आल्याने डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांचा आकडा 7 हजार 476 वर पोहोचला असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.
मुंबईत कोरोनाचे आज नवीन 1 हजार 566 रुग्ण, एकूण संख्या 28 हजार 634 वर - कोरोना न्यूज
दिवसेंदिवस मुंबईत कोरोनाग्रस्तांची संख्या वाढतच आहे. मुंबईत आज (शनिवार) नवे 1 हजार 566 रुग्ण आढळून आले. त्यामुळे मुंबईमधील कोरोनाग्रस्तांचा आकडा 28 हजार 634 वर पोहोचला आहे.
मुंबईत कोरोना विषाणूचे नवे 1 हजार 566 रुग्ण आढळून आले आहेत, त्यापैकी 1 हजार 274 रुग्ण मागील 24 तासात तर 292 रुग्ण 19 ते 21 मे दरम्यान खासगी लॅबमध्ये करण्यात आलेल्या टेस्टमध्ये पॉझिटिव्ह आले आहेत. 40 मृतांपैकी 22 रुग्णांना दिर्घकालीन आजार होते. 40 मृतांपैकी 25 पुरुष तर 15 महिला रुग्ण होत्या. मृत रुग्णांपैकी 4 जणांचे वय 40 वर्षाखाली होते, 21 जणांचे वय 60 वर्षावर होते तर 15 जणांचे वय 40 ते 60 वर्षादरम्यान होते. मुंबईमधील 7 सरकारी व पालिकेच्या 7 तसेच 13 खासगी लॅबमध्ये 22 मे पर्यंत 1 लाख 64 हजार 671 चाचण्या करण्यात आल्या आसल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.