मुंबई - राज्यात सक्रिय कोरोना रुग्ण संख्येने लाखांचा टप्पा ओलांडला आहे. राज्यात सक्रिय रुग्णांची संख्या 1 लाख 06 हजार 70 इतकी झाली आहे. राज्यात गुरुवारी नव्या 14 हजार 317 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. राज्यात एकूण कोरोना रुग्णांची संख्या 22 लाख 66 हजार 374 वर पोहोचली आहे.
राज्यातील कोरोनाची स्थिती :
राज्यात गुरुवारी 7 हजार 193 रुग्ण कोरोनामुक्त झाले.
राज्यात आतापर्यंत 21 लाख 06 हजार 400 रुग्णांनी कोरोनावर मात केली.
राज्यात गुरुवारी नव्या 14, 317 रुग्णांची नोंद झाली.
राज्यात गुरुवारी 57 रुग्णांचा कोरोनामुळे म्रुत्यू झाला.
राज्यात आतापर्यंत एकूण 22 लाख 66 हजार 374 रुग्णांची नोंद झाली.
राज्यात एकूण सक्रिय रुग्ण संख्या 1 लाख 06 हजार 070 इतकी झाली.
नागपुरात 15 ते 21 मार्च टाळेबंदी, पालकमंत्री राऊत यांची घोषणा
उपराजधानी नागपूर शहरात पोलीस आयुक्त कार्यालयाच्या हद्दीत कोरोनाबाधित रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे 15 ते 21 मार्च दरम्यान कडक टाळेबंदी लावण्याची घोषणा पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी केली आहे. या दरम्यान अत्यावश्यक सेवा सुरू राहणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
हेही वाचा -कोरोनालसीचा डोस घेतल्यानंतर मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिला लॉकडाऊनचा इशारा
औरंगाबादेत लॉकडाऊन
कोरोनाचे वाढते रुग्ण पाहता प्रशासनाने 11 मार्च ते 4 एप्रिल अंशतः टाळेबंदी करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. बाजार पेठांमध्ये काही निर्बंध प्रशासनाने लावले. लावलेल्या नियमांचे पालन होते की नाही? हे पाहण्यासाठी जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त व पोलीस आयुक्त थेट रस्त्यावर उतरले होते.
गुरुवारी रात्रीपासून जळगावात जनता कर्फ्यू लागणार
जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत चालला आहे. विशेष करून, जळगाव शहरात कोरोना वेगाने हातपाय पसरत आहे. गेल्या काही आठवड्यांपासून जळगाव शहर हे कोरोनाचे प्रमुख हॉटस्पॉट आहे. कोरोनाची साखळी खंडित करण्याच्या उद्देशाने जिल्हा प्रशासनाने जळगाव महापालिका हद्दीत 3 दिवसांचा जनता कर्फ्यू पाळण्याचा निर्णय घेतला आहे. 12 ते 14 मार्चदरम्यान हा जनता कर्फ्यू असणार आहे. या कर्फ्यूच्या काळात अत्यावश्यक सेवा वगळता इतर सेवांवर बंधने घालण्यात आली आहे.
हेही वाचा -रात्रीपासून जनता कर्फ्यू लागणार असल्याने जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी गर्दी
राज्यात कोणत्या भागात सर्वाधिक नव्या रुग्णांची नोंद :
मुंबई महानगरपालिका- 1,509
ठाणे- 157
ठाणे मनपा- 293
नवी मुंबई-194
कल्याण डोंबिवली- 270
पनवेल मनपा- 138
नाशिक-283
नाशिक मनपा-498
मालेगाव मनपा-114
अहमदनगर- 269
जळगाव- 600
जळगाव मनपा- 360
पुणे- 521
पुणे मनपा- 1,514
पिंपरी चिंचवड- 776
सातारा - 150
औरंगाबाद मनपा- 502
औरंगाबाद-113
जालना-273
बीड - 188
नांदेड मनपा- 156
अकोला-106
अकोला मनपा- 329
अमरावती- 183
अमरावती मनपा- 291
यवतमाळ-270
बुलडाणा-318
वाशिम - 128
नागपूर- 449
नागपूर मनपा-1701