मुंबई -राज्यात कोरोनाची दुसरी लाट तसेच रुग्णसंख्या आटोक्यात आहे. गेल्या महिन्यात 1 ते 2 हजाराच्या दरम्यान रुग्ण आढळून येत आहेत. त्यात 25 ऑक्टोबरला घट होऊन 889 तर 1 नोव्हेंबरला 809 रुग्णांची नोंद झाली होती. आज 2 नोव्हेंबरला त्यात किंचित वाढ होऊन 1078 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. आज 48 मृत्यूंची नोंद झाली असून, 1095 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यात रुग्ण बरे होण्याचा दर 97.59 टक्के तर मृत्युदर 2.12 टक्के इतका आहे.
हेही वाचा -माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची दिवाळी तुरुंगात, 6 नोव्हेंबरपर्यंत 'ईडी' कोठडी
- 15,485 सक्रिय रुग्ण -
आज राज्यात 1078 नवीन कोरोना रुग्णांचे निदान झाले आहे. यामुळे राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 66 लाख 12 हजार 965 वर पोहचला आहे. तर आज 48 रुग्णांचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा 1 लाख 40 हजार 274 वर पोहचला आहे. आज 1095 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आल्याने राज्यातील रुग्ण बरे होण्याचा आकडा 64 लाख 53 हजार 581 वर पोहचला आहे. रुग्ण बरे होण्याचा दर 97.59 टक्के तर मृत्यूदर 2.12 टक्के आहे. रुग्ण शोधून काढण्यासाठी आजपर्यंत 6 कोटी 28 लाख 43 हजार 792 चाचण्या करण्यात आल्या आहेत. एकूण करण्यात आलेल्या चाचण्यांपैकी 10.52 टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात सध्या 1 लाख 91 हजार 497 व्यक्ती होम क्वारंटाइनमध्ये असून 15 हजार 485 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.
- रुग्ण, मृत्यूसंख्येत घट -