मुंबई - महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट ओसरु लागली आहे. राज्याच्या आरोग्य विभागाकडून प्राप्त झालेल्या आकडेवारीनुसार. आज राज्यात 10 हजार 891 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. आतापर्यंत एकूण कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 58 लाख 52 हजार 891 इतकी झाली आहे. असे असले तरी आज राज्यात 16 हजार 577 इतक्या रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर आत्तापर्यंत कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांची संख्या 55 लाख 80 हजार 925 इतकी झाली आहे. एका बाजूला कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या जरी वाढत असली तरी कोरोनामुळे मृत होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. राज्यात 24 तासांत 295 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
Corona update : राज्यात मंगळवारी 10 हजार 891 नव्या रुग्णांची नोंद; तर 295 रुग्णांचा मृत्यू - महाराष्ट्र कोरोना बातमी
मंगळवारी राज्यात 10 हजार 891 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. आतापर्यंत एकूण कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 58 लाख 52 हजार 891 इतकी झाली आहे.
Corona update : राज्यात आज 10 हजार 891 नव्या रुग्णांची नोंद; तर 295 रुग्णांचा मृत्यू
कोरोना रुग्णांची जिल्ह्यानिहाय यादी -
- मुंबई महानगरपालिका - 682
- पालघर- 235
- रायगड- 503
- पनवेल- 103
- नाशिक- 173
- अहमदनगर- 469
- जळगाव-117
- पुणे - 734
- पुणे मनपा-362
- पिंपरी चिंचवड महानगरपालिका- 210
- सोलापूर-367
- सातारा -835
- कोल्हापूर-1028
- कोल्हापूर मनपा-306
- सांगली- 785
- सांगली मनपा-146
- सिंधुदुर्ग-645
- रत्नागिरी-704
- उस्मानाबाद-176
- बीड- 135
- अमरावती-141
- यवतमाळ-319
- नागपूर मनपा-141
Last Updated : Jun 8, 2021, 10:29 PM IST