मुंबई -मुंबईत डिसेंबर महिन्यापासून कोरोना विषाणूची तिसरी ( Corona Thired Wave ) लाट आली आहे. जानेवारीच्या सुरुवातीला ६ ते ८ जानेवारीदरम्यान सलग तीन दिवस २० हजारांच्यावर रुग्ण आढळून आले. त्यानंतर रुग्णसंख्येत घट होताना दिसत आहे. गुरुवारी १३ हजार ७०२, शुक्रवारी ११ हजार ३१७, शनिवारी १० हजार ६६१, रविवारी ७ हजार ८९५ रुग्णांची नोंद झाली आहे. आज सोमवारी त्यात आणखी घट ( Today Mumbai Corona Patient ) होऊन ५ हजार ९५६ रुग्णांची नोंद झाली आहे. आज १२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. रुग्णसंख्या घटत असल्याने सध्या ५० हजार ७५७ सक्रिय रुग्ण आहेत.
५९५६ नव्या रुग्णांची नोंद -
मुंबईत गेले दोन वर्षे कोरोनाचा प्रसार आहे. या दरम्यान कोरोनाच्या दोन लाटा आल्या. त्या दोन्ही लाटा थोपवण्यात पालिकेला यश आले आहे. पहिल्या लाटे दरम्यान २८०० तर दुसऱ्या लाटेदरम्यान कोरोनाचे ११ हजार ५०० सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली होती. डिसेंबर महिन्यात कोरोनाची तिसरी लाट आली असून ६ ते ८ जानेवारीदरम्यान सलग तीन दिवस २० हजारांच्यावर रुग्ण आढळून आले. त्यानंतर रुग्णसंख्येत घट होताना दिसत आहे. मुंबईत आज (१७ जानेवारीला) ५९५६ नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर १२ मृत्यूची नोंद झाली आहे. आज १५,५५१ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत एकूण १० लाख ५ हजार ८१८ रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी ९ लाख ३५ हजार ९३४ रुग्ण बरे झाले आहेत. तर १६ हजार ४६९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ५० हजार ७५७ सक्रिय रुग्ण आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९३ टक्के तर रुग्ण दुपटीचा कालावधी ५५ दिवस इतका आहे. मुंबईमधील ४७ इमारती सील आहेत. १० जानेवारी ते १६ जानेवारी या कालावधीत कोरोना वाढीचा दर १.२२ टक्के इतका आहे.
८५.३ टक्के बेड रिक्त -
मुंबईत आज आढळून आलेल्या ५९५६ रुग्णांपैकी ४९४४ म्हणजेच ८३ टक्के लक्षणे नसलेले रुग्ण आहेत. आज ४७९ रुग्णांना रुग्णालयात दाखल करावे लागले. ४५ रुग्णांना ऑक्सिजन बेडची आवश्यकता भासली आहे. मुंबईत रुग्णालयांमध्ये ३८,१४० बेडस असून त्यापैकी ५६२८ बेडवर म्हणजेच १४.७ टक्के बेडवर रुग्ण आहेत. इतर ८५.३ टक्के बेड रिक्त आहेत.
रुग्णसंख्या अशी घटते आहे रुग्णसंख्या -