मुंबई -राज्यात आजपासून (दि. 1 मे) 18 ते 44 वर्षे वयोगटातील लाभार्थ्यांना लसीकरणाला सुरुवात झाली. त्यासाठी आज 26 जिल्ह्यांत ठराविक ठिकाणी एकूण 132 लसीकरण सत्रे आयोजित करण्यात आले होते. सायंकाळी सहा वाजेपर्यंत एकूण 11 हजार 492 लाभार्थ्यांना लसीकरण करण्यात आले, असे आरोग्य विभागामार्फत कळविण्यात आले.
सायंकाळी सहा वाजेपर्यंत 26 जिल्ह्यात 11 हजार 492 लाभार्थ्यांचे लसीकरण - महाराष्ट्र कोरोना अपटेड
राज्यात आजपासून (दि. 1 मे) 18 ते 44 वर्षे वयोगटातील लाभार्थ्यांना लसीकरणाला सुरुवात झाली. सायंकाळी सहा वाजेपर्यंत 26 जिल्ह्यातील एकूण 11 हजार 492 लाभार्थ्यांना लसीकरण करण्यात आले, असे आरोग्य विभागामार्फत कळविण्यात आले.
लस
आजपासून 18 ते 44 वयोगटातील लाभार्थ्यांच्या लसीकरणाला 26 जिल्ह्यांमध्ये सुरुवात झाली. उर्वरीत जिल्ह्यांमध्ये उद्यापासून (दि. 2 मे) लसीकरण सुरू करण्यात येणार आहे. सद्यस्थितीत उत्पादकाकडे उपलब्ध असलेल्या साठ्यानुसार राज्याने या वयोगटासाठी कोव्हिशिल्ड लसीचे 3 लाख लसी खरेदी केले आहेत.
हेही वाचा -कोरोनामुळे बेरोजगारी..! हॉटेलचे काम गेल्याने मुलांनी चोरले 17 लाखांचे मोबाईल