महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

महायुतीच्या प्रचाराची आज मुंबईत सांगता, मोदी-ठाकरेंच्या संयुक्त सभेकडे लक्ष - assembly election of maharashtra

विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी भाजप-शिवसेना महायुतीची संयुक्त प्रचारसभेचा शेवट आज मुंबईत होत आहे.

संपादित छायाचित्र

By

Published : Oct 18, 2019, 4:08 PM IST

मुंबई- विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी भाजप-शिवसेना महायुतीची संयुक्त प्रचारसभेचा शेवट आज मुंबईत होत असून त्यानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे एकाच व्यासपीठावर येणार आहेत.

हेही वाचा - बंडखोर उमेदवार व माजी आमदार तृप्ती सावंत यांची शिवसेनेतून हकालपट्टी

विधानसभा निवडणुकीत जागावाटपात भाजप १६४ तर शिवसेना १२४ जागा अशारितीने युती झाली. महायुतीला २२० जागा मिळवण्याचे लक्ष्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठेवले आहे. त्यामुळेच निवडणूक प्रचार काळात एकत्र न फिरता स्वतंत्रपणे फिरून जास्तीत जास्त मतदारसंघात पोहोचण्याची रणनीती ठरवण्यात आली. केवळ युतीचेच नाही तर भाजपचे नेतेही वेगवेगळे फिरून अधिकाधिक मतदारसंघात पोहोचत आहेत. त्यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जळगावमधील पहिली सभा सोडली तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मोदी

यांच्या सभेत दिसत नाहीत. त्यावेळेत ते इतर दोन मतदारसंघात सभा घेतात. शनिवारी प्रचाराचा शेवटचा दिवस असून त्याआधी शिरस्त्याप्रमाणे भाजप-शिवसेनेच्या सर्वोच्च नेत्यांची मुंबईत सभा होत आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पुन्हा एकदा भाजपच्याच मुख्यमंत्रीपदाचे वक्तव्य केले असून उध्दव ठाकरे त्याला काय उत्तर देतात हे पाहणेही महत्वाचे ठरणार आहे.

हेही वाचा - मी पहिल्याच दिवशी सेनेचा राजीनामा दिला - तृप्ती सावंत


त्यानुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा वांद्रे-कुर्ला संकुलातील मैदानावर आज (शुक्रवार) सायंकाळी होणार आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यावेळी उपस्थित राहतील. महायुतीचे अनेक बंडखोर एकमेकांविरोधात उभे आहेत. या पार्श्वभूमीवर युतीच्या सर्वोच्च नेत्यांच्या या पहिल्या व शेवटच्या संयुक्त प्रचार सभेत काय संदेश देतात याबाबत उत्सुकता आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details