महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

भाजपची आज तिसरी मेगाभरती, हर्षवर्धन पाटलांसह गणेश नाईकांचा प्रवेश - विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर

भाजपमध्ये होत असलेल्या मेगा भरतीचा  तिसरा टप्पा आज मुंबईत पार पडणार आहे. यामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे २ बडे नेते पक्षांतर करत आहेत. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर  काँग्रेस आणि राष्ट्रवादीला लागलेली गळती काही केल्या थांबण्यास तयार नाही.

हर्षवधन पाटलांसह गणेश नाईकांचा आज भाजप्रवेश

By

Published : Sep 11, 2019, 12:11 PM IST

Updated : Sep 11, 2019, 1:05 PM IST


मुंबई -भाजपमध्ये होत असलेल्या मेगा भरतीचा तिसरा टप्पा आज मुंबईत पार पडणार आहे. यामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे २ बडे नेते पक्षांतर करत आहेत. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस आणि राष्ट्रवादीला लागलेली गळती काही केल्या थांबण्यास तयार नाही.

हर्षवर्धन पाटील
आज मुंबईत काँग्रेसचे बडे नेते आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील हे भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थित पाटील यांचा प्रवेश होणार आहे. गेल्या काही काळापासून हर्षवर्धन पाटील हे भाजपमध्ये जाणार याची चर्चा सुरू होती. आगामी भूमिका काय असावी यासाठी पाटील यांनी गेल्या आठवड्यात त्यांच्या समर्थकांचा मेळावा देखील आयोजित केला होता. या मेळाव्यात त्यांच्या समर्थकांनी एकमुखाने भाजपमध्ये जाण्याची जोरदार मागणी केली होती. या मेळाव्यानंतर लवकरच आपण निर्णय घेऊ, असे हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले होते.

कोण आहेत हर्षवर्धन पाटील
१) इंदापूर तालुक्याचे माजी आमदार आणि मंत्री
२) पश्चिम महाराष्ट्रातील काँग्रेसचा प्रमुख चेहरा
३) काँग्रेसचे माजी खासदार शंकरराव पाटील यांचे पुतणे
४) २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या दत्ता भरणेंकडून पराभूत
५) काँग्रेसकडून मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत असलेलं नाव
६) मुख्यमंत्री मनोहर जोशी आणि उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या युती सरकारमध्ये पाच वर्षे मंत्री म्हणून काम
७) एकूण सहा मुख्यमंत्र्यांच्या मंत्रिमंडळात कामाचा अनुभव

गणेश नाईक
माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे विश्वासू सहकारी अशी ओळख असलेले गणेश नाईक हे देखील आज भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. गेल्याच महिन्यात त्यांचे पुत्र आमदार संदिप नाईक यांनी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला होता. आता त्यानंतर गणेश नाईक हे देखील भाजप प्रवेश करणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला होता. मात्र, अखेर या चर्चांना आज पूर्णविराम मिळणार आहे.

कोण आहेत गणेश नाईक
१) आघाडी सराकमध्ये नवी मुंबईचे पालकमंत्री
२) नवी मुंबईतील राष्ट्रवादीचे बडे नेते
३) शरद पवारांचे निकटवर्तीय
४) युती सरकारच्या काळात कॅबीनेट मंत्री म्हणून काम

Last Updated : Sep 11, 2019, 1:05 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details