मुंबई :बिटकॉइन ही जगातील सर्वात मोठी क्रिप्टोकरन्सी आहे. त्याची किंमत सुमारे 439.77 दशलक्ष डॉलर होती. आज बीटकॉइनची किंमत 19,27,759.92 आसपास आहे. इथेरिअमची किंमत 1,34,469.86 रूपये आहे. बायनान्सची किंमत 27,047.72 रूपये आहे. गेल्या 24 तासांमध्ये बिटकॉइन, इथेरिअम, बायनान्सचा दर हा वाढला आहे.
क्रिप्टोकरन्सीचे मागील काही दिवसांचे दर : क्रिप्टोकरन्सी ही एक प्रकारची डिजिटल मालमत्ता आहे. ज्याप्रकारे आपण नोटा आणि नाण्याद्वारे व्यवहार करतो, त्याचप्रकारे वस्तू किंवा सेवांच्या खरेदीसाठी क्रिप्टोकरन्सी वापरली जाते. ही एक पीअर टू पीअर इलेक्ट्रॉनिक सिस्टम आहे, ज्याद्वारे आपण इंटरनेटवरून नियमित चलनांऐवजी वस्तू आणि सेवा खरेदी करण्यासाठी वापरू शकतो. क्रिप्टोकरन्सीच्या व्यवहारांकडे तरुणांचे मोठ्या प्रमाणात लक्ष असते. काल म्हणजेच ( बुधवारी दि.1 ) बीटकॉइनची किंमत 18, 89,798 च्या आसपास होती. इथेरिअमची किंमत 1,29,720 रूपये होती. तर बायनान्सची किंमत 25,720 रूपये होती. तर ( गुरूवारी दि.2 ) बीटकॉइनची हीच कींमत 19,23,818 च्या आसपास होती. इथेरिअमची किंमत 1,33,386 रूपये होती. तर बायनान्सची किंमत 25,916 रूपये होती.
इथेरिअमचा इतिहास : एथेरिअमचा पुरवठा कोणत्याही सरकार किंवा कंपनीद्वारे नियंत्रित केला जातो. ते विकेंद्रित आहे. जगभरातील लोक एथेरिअमचा उपयोग पेमेंट करण्यासाठी करतात. २०१५ मध्ये एथेरिअम तयार करण्यात आले. एथेरिअम हे एक प्रकारचे क्रिप्टोकरन्सी आहे. जो ब्लॉकचेन तंत्रज्ञानावर आधारित मुक्त स्रोत मंच आहे. इतर ब्लॉकचेन्स प्रमाणेच, एथेरिअमचे एथेर नावाचे मूळ क्रिप्टोकरन्सी आहे. ईटीएच हे डिजिटल पैसे आहेत. जर बिटकॉइनबद्दल ऐकले तर एथेरिअममध्ये बर्याच वैशिष्ट्यांचा समावेश आहे. हे पूर्णपणे डिजिटल आहे. जगात कोणालाही त्वरित पाठवले जाऊ शकते.