मुंबई - भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची आज संध्याकाळी मातोश्रीवर भेट होणार आहे. या भेटीत युतीची घोषणा होण्याची शक्यता आहे. भाजपविरोधात सर्व विरोधक एकवटल्याने भाजपने नरमाईची भूमिका घेत शिवसेनेची मनधरणी केली आहे. त्यामुळे युतीचा प्रश्न निकाली निघणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
अमित शाह आज मातोश्रीवर, युतीचा निर्णय होण्याची शक्यता - thackaeray
अमित शाह हे आज उद्धव ठाकरे यांच्याबरोबर युतीसंदर्भात चर्चा करणार आहेत. त्यामुळे आज युतीची घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
अमित शाह हे आज उद्धव ठाकरे यांच्याबरोबर युतीसंदर्भात चर्चा करणार आहेत. त्यामुळे आज युतीची घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या भेटीनंतर शिवसेना पत्रकार परिषद घेणार असून आपली भूमिका स्पष्ट करणार आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुक युती विरुद्ध आघाडी होण्याची शक्यता आहे.
शिवसेनेला पालघर लोकसभा मतदार संघ देण्यात आला आहे. २४-२४ जागा हा फॉर्मुला लोकसभेसाठी शिवसेना-भाजप यांच्यात झाल्याचे समजते. तर विधानसभा निवडणुकीसाठी १४० जागा प्रत्येकी असा फॉर्म्युला तयार करण्यात आला आहे. मित्रपक्षांसाठी ८ जागा सोडण्यात येण्याची शक्यता आहे. केंद्रात भाजपचा पंतप्रधान असेल तर राज्यात शिवसेनेला मुख्यमंत्री पद हवे आहे. यामुळे मुख्यमंत्री पदावर कोण विराजमान होणार हा तिढाही कायम आहे. युतीच्या जागावाटपाबाबत नाणार प्रकल्प, शेतकऱ्यांचे प्रश्न शिवसेनेने अग्रक्रमावर ठेवले आहेत.