मुंबई : भूमिपूजनासाठी मंगेशकर कुटुंबातील सदस्य उषा मंगेशकर या उपस्थित राहणार आहेत. राज्याचे महिला व बाल विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या उपस्थितीत भूमिपूजनाचा हा सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्याच्या माध्यमातून लता मंगेशकर यांना राज्य सरकारकडून आदरांजली वाहिली जाणार आहे. या आधीही लता मंगेशकर संगीत अकॅडमी सुरू करण्याची घोषणा राज्य सरकारकडून करण्यात आली आहे. मुंबई विद्यापीठाच्या कलिना परिसरात देशातील पहिली लता मंगेशकर संगीत महाविद्यालय अकादमी सुरू केली जाणार असल्याची घोषणा करण्यात आली होती. शासकीय कार्यक्रमात सोबतच आज मुंबईसह देशभरात अनेक ठिकाणी लता मंगेशकर यांच्या गाण्यांचे कार्यक्रम होत आहे.
सात दशकांची कारकिर्द :हिंदी चित्रपट सृष्टीसहित सर्व भारतीयांच्या मनावर गेली 70 वर्ष लतादीदींच्या गाण्यांनी आणि स्वरांनी अधिराज्य गाजवले आहे. 28 सप्टेंबर 1929 साली लता मंगेशकर यांचा जन्म इंदोर येथे झाला होता. त्यांनी आपल्या सात दशकांच्या कारकिर्दीत पाच हजारपेक्षा अधिक गाणी गायली आहेत. हिंदी आणि मराठी भाषेतही देशातल्या 20 भाषांमध्ये लता मंगेशकर यांनी गाणे गायले आहेत. त्यांनी अगदी देवाच्या आरतीपासून ते पार्टीमध्ये वाजवली जाणारी गीते गायली आहेत. ही सर्वच गीते प्रेक्षकांनी नेहमीच डोक्यावर घेतली. 1945 साली त्यांनी उस्ताद अमानत अली खान यांच्याकडून त्यांनी हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताचे धडे गिरवले.