महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मुंबईत सोमवारी 94 हजार 941 लाभार्थ्यांचे लसीकरण - corona vaccination in mumbai

मुंबईत सोमवारी 94 हजार 941 लाभार्थ्यांना लस देण्यात आली. 16 जानेवारीपासून आतापर्यंत एकूण 36 लाख 76 हजार 615 लाभार्थ्यांना लस देण्यात आली.

मुंबईत आज सोमवारी 94 हजार 941 लाभार्थ्यांचे लसीकरण
मुंबईत आज सोमवारी 94 हजार 941 लाभार्थ्यांचे लसीकरण

By

Published : Jun 7, 2021, 10:28 PM IST

मुंबई - मुंबईतील कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी 16 जानेवारीपासून लसीकरण मोहीम सुरू आहे. या मोहिमेनुसार सोमवार ते बुधवार वॉक इन पद्धतीने येणाऱ्या तर गुरुवार ते शनिवार नोंदणी पद्धतीने येणाऱ्या 45 वर्षावरील नागरिकांचे लसीकरण केले जात आहे. आज सोमवारी 94 हजार 941 लाभार्थ्यांना लस देण्यात आली. 16 जानेवारीपासून आतापर्यंत एकूण 36 लाख 76 हजार 615 लाभार्थ्यांना लस देण्यात आली.


लसीकरणाची आकडेवारी-
मुंबईत आज 94 हजार 941 हजार लाभार्थ्यांना लस देण्यात आली. त्यात 86 हजार 631 लाभार्थ्यांना पहिला तर 8 हजार 310 लाभार्थ्यांना दुसरा डोस देण्यात आला. आतापर्यंत एकूण 36 लाख 76 हजार 615 लाभार्थ्यांना लस देण्यात आली. त्यात 28 लाख 99 हजार 666 लाभार्थ्यांना पहिला तर 7 लाख 76 हजार 949 लाभार्थ्यांना दुसरा डोस देण्यात आला. आतापर्यंत आरोग्य कर्मचाऱ्यांना 3 लाख 6 हजार 494, फ्रंटलाईन वर्करना 3 लाख 63 हजार 596, जेष्ठ नागरिकांना 12 लाख 51 हजार 882, 45 ते 59 वर्षामधील नागरिकांना 12 लाख 22 हजार 620 तर 18 ते 44 वर्षामधील नागरिकांना 5 लाख 27 हजार 480, 1 हजार 825 स्तनदा मातांचे तसेच देशाबाहेर शिक्षण घेण्यास जाणाऱ्या 2 हजार 718 विद्यार्थ्यांना लसीचे डोस देण्यात आले आहेत.

लसीकरण मोहीम -
मुंबईत कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी 16 जानेवारीपासून कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली. सुरुवातीला आरोग्य कर्मचारी व फ्रंट लाईन वर्करना लस दिली जात होती. 1 मार्चपासून 60 वर्षावरील वयोवृद्ध तसेच 45 ते 59 वर्षामधील विविध गंभीर आजार असलेल्या नागरिकांना लस दिली जात आहे. 1 मे पासून 18 ते 45 वर्षामधील लाभार्थ्यांचे लसीकरण सुरु झाले आहे. सोमवार ते बुधवार जेष्ठ नागरिक तसेच दिव्यांग यांचे लसीकरण केले जाणार आहे. तर गुरुवार ते शनिवार पर्यंत कोविन ऍपवर नोंदणी करून मोबाईलवर संदेश आला असेल तरच लसीकरणाला या असे आवाहन पालिकेने केले आहे. स्तनदा माता आणि गरोदर महिलांचेही लसीकरण केले जाणार आहे.

एकूण लसीकरण -
आरोग्य कर्मचारी - 3,06,494
फ्रंटलाईन वर्कर - 3,63,596
जेष्ठ नागरिक - 12,51,882
45 ते 59 वय - 12,22,620
18 तर 44 वय - 5,27,480
स्तनदा माता - 1,825
परदेशी शिक्षण विद्यार्थी - 2,718
एकूण - 36,76,615


ABOUT THE AUTHOR

...view details