मुंबई - दिवसेंदिवस मुंबईत कोरोनाचे रुग्ण वाढतच आहेत. आज (शनिवार) मुंबईत नवीन 884 कोरोनाग्रस्तांची नोंद झाली. त्यामुळे मुंबईमधील कोरोनाग्रस्तांचा आकडा हा 18 हजार 396वर पोहोचला आहे. तर आज 41 जणांचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा 696वर पोहोचला आहे. मुंबईत आतापर्यंत 4 हजार 806 रुग्ण बरे होऊन घरी गेले असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.
मुंबईत कोरोनाचे नवे 884 रुग्ण, एकूण संख्या 18 हजार 396 वर - corona news in mumbai
दिवसेंदिवस मुंबईत कोरोनाचे रुग्ण वाढतच आहेत. आज (शनिवार) मुंबईत नवीन 884 कोरोनाग्रस्तांची नोंद झाली. त्यामुळे मुंबईमधील कोरोनाग्रस्तांचा आकडा हा 18 हजार 396 वर पोहोचला आहे. तर आज 41 जणांचा मृत्यू झाला आहे.
जगभरात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. या विषाणूचे मुंबईत रोज शेकडो रुग्ण आढळून येत आहेत. मुंबईत गेल्या 24 तासात 884 रुग्ण आढळून आले आहेत. मुंबईत 41 जणांचा मृत्यू झाला असून त्यापैकी 27 जणांचा मृत्यू गेल्या 24 तासात झाला आहे. तर 14 जणांचा मृत्यू 7 तर 12 मे दरम्यानचे आहेत. या रुग्णांचा मृत्यू नेकमा कोरोनामुळेच झाला का याचा अहवाल येणे बाकी होता. तो अहवाल आल्यावर या 14 जणांचा मृत्यू कोरोनामुळेच झाला असल्याचे आरोग्य विभागाने जाहीर केले आहे. 41 पैकी 24 रुग्णांना दिर्घकालीन आजार होते. मृतांमध्ये 26 रुग्ण पुरुष तर 16 महिला रुग्ण होत्या. मुंबईमधून 238 रुग्णांना आज डिस्चार्ज दिल्याने डिस्चार्ज दिलेल्यांचा आकडा 4 हजार 806 वर पोहोचला असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.