महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Corona Update : 974 रुग्णांना डिस्चार्ज, 848 नवे बाधित, 50 रुग्णांचा मृत्यू - आजची कोरोना आकडेवारी

राज्यात गुरूवारी 848 नव्या कोरोना रुग्णांची (Todays New Corona Cases) नोंद झाली असून 50 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर 974 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यात रुग्ण बरे होण्याचा दर 97.68 टक्के तर मृत्युदर 2.12 टक्के इतका आहे.

corona file photo
कोरोना फाईल फोटो

By

Published : Nov 25, 2021, 10:05 PM IST

मुंबई - राज्यात कोरोनाची (Corona Virus) दुसरी लाट तसेच रुग्णसंख्या आटोक्यात येत आहे. गेल्या काही दिवसात 1 ते 2 हजाराच्या दरम्यान रुग्ण आढळून येत आहेत. त्यात गेल्या काही दिवसात घट झाली आहे. आज गुरूवारी 848 नव्या रुग्णांची (Todays New Corona Cases) नोंद झाली असून 50 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर 974 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यात रुग्ण बरे होण्याचा दर 97.68 टक्के तर मृत्युदर 2.12 टक्के इतका आहे.

  • 9,178 सक्रिय रुग्ण -

आज राज्यात 848 नवीन कोरोना रुग्णांचे निदान झाले आहे. यामुळे राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 66 लाख 33 हजार 105 वर पोहचला आहे. तर आज 50 रुग्णांचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा 1 लाख 40 हजार 857 वर पोहचला आहे. आज 974 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आल्याने राज्यातील रुग्ण बरे होण्याचा आकडा 64 लाख 79 हजार 396 वर पोहचला आहे. रुग्ण बरे होण्याचा दर 97.68 टक्के तर मृत्यूदर 2.12 टक्के आहे. रुग्ण शोधून काढण्यासाठी आजपर्यंत 6 कोटी 50 लाख 47 हजार 491 चाचण्या करण्यात आल्या आहेत.

एकूण करण्यात आलेल्या चाचण्यांपैकी 10.2 टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात सध्या 90 हजार 538 व्यक्ती होम क्वारंटाइनमध्ये असून 9 हजार 178 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.

  • रुग्णसंख्येत चढउतार -

26 ऑगस्टला 5 हजार 108, 9 सप्टेंबरला 4 हजार 219, 1 ऑक्टोबरला 3105, 4 ऑक्टोबरला 2026, 11 ऑक्टोबरला 1736, 14 ऑक्टोबरला 2384, 15 ऑक्टोबरला 2149, 25 ऑक्टोबरला 889, 1 नोव्हेंबरला 809, 2 नोव्हेंबरला 1078, 3 नोव्हेंबरला 1193, 4 नोव्हेंबरला 1141, 5 नोव्हेंबरला 802, 6 नोव्हेंबरला 661, 7 नोव्हेंबरला 892, 8 नोव्हेंबरला 751, 9 नोव्हेंबरला 982, 10 नोव्हेंबरला 1094, 11 नोव्हेंबरला 997, 12 नोव्हेंबरला 925, 13 नोव्हेंबरला 999, 14 नोव्हेंबरला 956, 15 नोव्हेंबरला 686, 16 नोव्हेंबरला 886, 17 नोव्हेंबरला 1003, 18 नोव्हेंबरला 963, 19 नोव्हेंबरला 906, 20 नोव्हेंबरला 833, 21 नोव्हेंबरला 845, 22 नोव्हेंबरला 656, 23 नोव्हेंबरला 766, 24 नोव्हेंबरला 960, 25 नोव्हेंबरला 848 रुग्ण आढळून आले आहेत.

  • मृत्यू संख्येत चढ उतार -

तर 28 जुलैला 286, 6 ऑक्टोबरला 90, 20 ऑक्टोबरला 21, 21 ऑक्टोबरला 39, 22 ऑक्टोबरला 40, 23 ऑक्टोबरला 33, 24 ऑक्टोबला 18, 25 ऑक्टोबरला 12, 26 ऑक्टोबरला 32, 27 ऑक्टोबरला 38, 28 ऑक्टोबरला 36, 29 ऑक्टोबरला 36, 30 ऑक्टोबरला 26, 31 ऑक्टोबरला 20, 1 नोव्हेंबरला 10, 2 नोव्हेंबरला 48, 3 नोव्हेंबरला 39, 4 नोव्हेंबरला 32, 5 नोव्हेंबरला 17, 6 नोव्हेंबरला 10, 7 नोव्हेंबरला 16, 8 नोव्हेंबरला 15, 9 नोव्हेंबरला 27, 10 नोव्हेंबरला 17, 11 नोव्हेंबरला 28, 12 नोव्हेंबरला 41, 13 नोव्हेंबरला 49, 14 नोव्हेंबरला 18, 15 नोव्हेंबरला 19, 16 नोव्हेंबरला 34, 17 नोव्हेंबरला 32, 18 नोव्हेंबरला 24, 19 नोव्हेंबरला 15, 20 नोव्हेंबरला 15, 21 नोव्हेंबरला 17, 22 नोव्हेंबरला 8, 23 नोव्हेंबरला 19, 24 नोव्हेंबरला 41, 25 नोव्हेंबरला 50 मृत्यूंची नोंद झाली आहे.

  • या विभागात सर्वाधिक रुग्ण -

मुंबई महापालिका - 174
अहमदनगर - 73
पुणे - 100
पुणे पालिका - 94
पिंपरी चिंचवड पालिका - 59

ABOUT THE AUTHOR

...view details