मुंबई - कोरोनाचा हॉटस्पॉट बनलेल्या मुंबईत गेल्या काही दिवसात कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत होते. त्यात काल घसरण झाली होती. आज (बुधवार) पुन्हा कोरोना रुग्णांचा संख्येत वाढ पाहायला मिळाली आहे. त्याचप्रमाणे कोरोनामधून बरे झालेल्या रुग्णांचा संख्येतही आज वाढ पाहायला मिळाली आहे. यामुळे मुंबईकरांना काहीसा दिलासा मिळाला आहे.
मुंबईत आज नवीन 800 कोरोनाग्रस्तांची नोंद, एकूण संख्या 15 हजार 581 वर - मुंबई लेटेस्ट न्यूज
कोरोनाचा हॉटस्पॉट बनलेल्या मुंबईत गेल्या काही दिवसात कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत होते. त्यात काल घसरण झाली होती. आज (बुधवार) पुन्हा कोरोना रुग्णांचा संख्येत वाढ पाहायला मिळाली आहे. मुंबईत आज कोरोनाचे नवे 800 रुग्ण आढळून आले.
मुंबईत आज कोरोनाचे नवे 800 रुग्ण आढळून आले. मुंबईतील एकूण रुग्णसंख्या 15 हजार 581 वर पोहोचली आहे. 10 आणि 11 मे रोजी खासगी लॅबमध्ये टेस्ट केलेले 198 रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. तर 4 ते 10 मे दरम्यान 17 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याचा अहवाल समितीने दिल्याने त्यांची नोंद आजच्या आकडेवारीत करण्यात आली आहे. गेल्या 24 तासात 23 जणांचा मृत्यू झाला आहे. मुंबईत कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा 596 वर पोहोचला असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.
डिस्चार्जचा आकडा वाढला -
मुंबईमधून रोज 100 ते 200 रुग्ण बरे होऊन घरी जात होते. आज त्यात मोठ्या प्रमाणात वाढ पाहायला मिळाली आहे. आज मुंबईमधून 478 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला असल्याने डिस्चार्ज देण्यात आलेल्यांचा आकडा 3 हजार 791 वर पोहोचला आहे.