मुंबई - जगभरात थैमान घातलेल्या कोरोनाचा देशासह राज्यातही दिवसेंदिवस प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. राज्यामध्ये मुंबई, पुणे, ठाणे या भागात कोरोनाग्रस्तांची संख्या जास्त वाढताना दिसत आहे. आज (सोमवार) राज्यात 771 नवीन कोरोनाग्रस्ताची नोंद झाली असून, 35 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. राज्यातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा आता 14 हजार 541 वर पोहोचला आहे.
आज राज्यात 771 नवीन कोरोनाग्रस्तांची नोंद, एकूण रुग्णसंख्या 14 हजार 541 - corona in maharshtra
राज्यामध्ये मुंबई, पुणे, ठाणे या भागात कोरोनाग्रस्तांची संख्या जास्त वाढताना दिसत आहे. आज (सोमवार) राज्यात 771 नवीन कोरोनाग्रस्ताची नोंद झाली असून, 35 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
आज 771 नवीन कोरोनाग्रसांची नोंद
आज मुंबईत नव्याने 441 रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे मुंबईमधील कोरोना विषाणूची लागण झालेल्या रुग्णांची संख्या आता 8 हजार 613 वर पोहोचली आहे. मुंबईत गेल्या 24 तासात 21 जणांचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा 343 वर पोहोचला आहे. तर राज्यातील मृतांची संख्या ही 583 झाली आहे.
Last Updated : May 5, 2020, 1:32 AM IST