मुंबई -राज्यात मागील दीड वर्षापासून कोरोनाचा प्रसार आहे. राज्यात आलेली कोरोना विषाणूची दुसरी लाट ओसरत आहे. त्यामुळे गेले काही दिवस राज्यातील कोरोना रुग्ण आणि मृतांच्या संख्येत चढउतार दिसून येत आहे. रविवारी ९ हजार रुग्ण आढळून आले होते. सोमवारी त्यात घट होऊन ६०१७ रुग्ण आढळून आले होते. बुधवारी ८१५९ रुग्ण आढळून आले होते. तर गुरुवारी राज्यात ७३०२ नवे रुग्ण आढळून आले असून, १२० कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. गेले काही दिवस रुग्णसंख्या आणि मृत्यूसंख्येत सतत चढउतार दिसून येत आहे.
७७६५ रुग्णांना डिस्चार्ज -
राज्यात गुरुवारी ७७६५ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण ६०,१६,५०६ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.३४ टक्के एवढे झाले आहे. गुरुवारी राज्यात ७३०२ नवीन रुग्णाांचे निदान झाले असून, १२० कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. आतापर्यंत एकूण १,३०,९१८ मृत्यूची नोंद झाली आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ४,६२,६४,०५९ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६२,४५,०५७ (१३.५ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ५,५१,८७२ व्यक्ती होम क्वारांटाईनमध्ये आहेत तर ३,७४३ व्यक्ती संस्थात्म क्वारांटाईन मध्ये आहेत. राज्यात आज रोजी एकूण ९४,१६८ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.
रुग्ण, मृत्यू संख्येत चढउतार -