मुंबई - दिवसेंदिवस मुंबईतील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढतच आहे. आज नवीन 692 रुग्णांचे नोंद झाली. त्यामुळे मुंबईमधील कोरोनाग्रस्तांचा आकडा हा 11 हजार 219 वर पोहोचला आहे. तर मुंबईत कोरोनामुळे आज 25 जणांचा मृत्यू झाला असल्याने मृतांचा एकूण आकडा 437 वर पोहोचला आहे.
मुंबईत नवीन 692 कोरोनाग्रस्तांची नोंद, एकूण रुग्णसंख्या 11 हजारांच्या वर
दिवसेंदिवस मुंबईतील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढतच आहे. आज नवीन 692 रुग्णांचे नोंद झाली. त्यामुळे मुंबईमधील कोरोनाग्रस्तांचा आकडा हा 11 हजार 219 वर पोहोचला आहे.
मुंबईमधून आतापर्यंत 2 हजार 435 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे. मुंबईत आज कोरोना विषाणूच्या नव्या 692 रुग्णांचे निदान झाले आहे. त्यापैकी 522 रुग्ण गेल्या 24 तासात आढळून आले आहेत. तर 170 रुग्ण 3 ते 5 मे दरम्यान खासगी लॅबमध्ये करण्यात आलेल्या चाचण्यांमध्ये पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. आज मुंबईत 25 जणांचा मृत्यू झाला असून, त्यापैकी 13 रुग्णांना दिर्घकालीन आजार होते. 25 मृतांपैकी 13 पुरुष तर 12 महिला रुग्ण होत्या. मृतांपैकी 3 जणांचे वय 40 वर्षाखालील होते. 12 जणांचे वय 60 वर्षावर होते तर 10 जणांचे वय 40 ते 60 दरम्यान आहे. मुंबईच्या विविध रुग्णालयांमधून 148 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. मुंबईमधून आतापर्यंत 2 हजार 435 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.
धारावीत आज 50 नवे रुग्ण, एकूण 783 रुग्ण -
कोरोनाचा हॉटस्पॉट ठरलेल्या धारावीत 50 नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे धारावीतील कोरोनाबाधितांचा आकडा 783 वर पोहोचला आहे. तर कोरोनामुळे धारावीमध्ये आतापर्यंत 21 जणांचा मृत्यू झाला आहे.