महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

धारावीत नवीन ६८ कोरोनाग्रस्तांची नोंद, एकूण रुग्णसंख्या ७३३ वर - धारावीत नवीन ६८ कोरोनाग्रस्तांची नोंद

आज (बुधवार) मुंबईतील धारावीमध्ये ६८ नवीन कोरोनाग्रस्तांची नोंद झाली असून, एकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

today 68 new corona positive cases found in dharavi
धारावीत नवीन ६८ कोरोनाग्रस्तांची नोंद

By

Published : May 6, 2020, 8:33 PM IST

मुंबई - देशासह राज्यात कोरोनाने थैमान घातले आहे. राज्यात मुंबई, ठाणे, पुणे, मालेगाव या मोठ्या शहरात झपाट्याने कोरोनाग्रस्तांची संख्या वाढताना दिसत आहे. अशातच आज (बुधवार) मुंबईतील धारावीमध्ये ६८ नवीन कोरोनाग्रस्तांची नोंद झाली असून, एकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

धारावीत झपाट्याने कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत असल्याचे पाहायला मिळत आहे. या परिसरात आत्तापर्यंत ७३३ कोरोनाग्रस्तांची नोंद झाली आहे. तर २१ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details