महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मुंबईत कोरोनाचे 3672 नवे रुग्ण, 79 रुग्णांचा मृत्यू - mumbai corona news today

आज 3 हजार 672 नवे रुग्ण आढळून आले असून 79 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज 5 हजार 542 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

today 3,672 new COVID-19 cases in Mumbai
मुंबईत कोरोनाचे 3672 नवे रुग्ण, 79 रुग्णांचा मृत्यू

By

Published : May 2, 2021, 8:30 PM IST

मुंबई - मुंबईत गेले काही दिवस कोरोना विषाणूच्या रुग्णांची संख्या वाढली होती. रोज 7 ते 11 हजाराच्यावर रुग्ण आढळून येत होते. त्यात घट होताना दिसत आहे. आज 3 हजार 672 नवे रुग्ण आढळून आले असून 79 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज 5 हजार542 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. नव्या रुग्णांच्या प्रमाणात डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या अधिक आहे.


रुग्ण दुपटीचा कालावधी 103 दिवस -
मुंबईत आज 3 हजार 672 रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे कोरोनाग्रस्तांचा आकडा 6 लाख 56 हजार 204 वर पोहोचला आहे. आज 79 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मृतांचा आकडा 13 हजार 330 वर पोहोचला आहे. 5 हजार 542 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आल्याने रुग्ण बरे होण्याची संख्या 5 लाख 83 हजार 873 वर पोहोचली आहे. मुंबईत सध्या 57 हजार 342 सक्रिय रुग्ण आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 89 टक्के असून रुग्ण दुप्पटीचा कालावधी 103 दिवस इतका आहे. मुंबईत कोरोना रुग्ण आढळून आलेल्या 107 चाळी आणि झोपडपट्ट्या कंटेंनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आल्या आहेत. तर 903 इमारती रुग्ण आढळून आल्याने सील करण्यात आल्या आहेत. कोरोना रुग्णांचा शोध घेण्यासाठी आज 28 हजार 636 तर आतापर्यंत एकूण 54 लाख 90 हजार 241 चाचण्या करण्यात आल्या आहेत. अशी माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.

हे विभाग हॉटस्पॉट -
मुंबईत अंधेरी, कांदिवली, गोरेगाव, वांद्रे, मालाड, जोगेश्वरी, मुलुंड, चेंबूर, घाटकोपर आदी विभाग कोरोनाचे हॉटस्पॉट ठरले आहे. या विभागात सर्वाधिक कोरोना सक्रिय रुग्ण आहेत. यामुळे या विभागात कोरोना नियमांची कडक अंमलबजावणी महापालिकेने सुरू केली आहे.

अशी वाढली रुग्णसंख्या -
गेल्या वर्षभरात 1 फेब्रुवारीला 328 म्हणजेच सर्वात कमी रुग्ण आढळून आले आहेत. त्यात वाढ होत जाऊन 18 मार्चला 2 हजार877, 19 मार्च 3 हजार062, 20 मार्चला 2 हजार982, 21 मार्चला 3 हजार775, 22 मार्चला 3 हजार260, 23 मार्चला 3 हजार512, 24 मार्चला 5 हजार185, 25 मार्चला 5 हजार504, 26 मार्चला 5 हजार513, 27 मार्चला 6 हजार123, 28 मार्चला 6 हजार923, 29 मार्चला 5 हजार888, 30 मार्चला 4 हजार758, 31 मार्चला 5 हजार394, 1 एप्रिल 8 हजार646, 2 एप्रिलला 8 हजार832, 3 एप्रिलला 9 हजार090, 4 एप्रिलला 11 हजार163, 5 एप्रिलला 9 हजार857, 6 एप्रिलला 10 हजार030, 7 एप्रिलला 10 हजार428, 8 एप्रिलला 8 हजार938, 9 एप्रिलला 9 हजार200, 10 एप्रिलला 9 हजार327, 11 एप्रिलला 9 हजार989, 12 एप्रिलला 6 हजार905, 13 एप्रिलला 7 हजार898, 14 एप्रिलला 9 हजार925, 15 एप्रिलला 8 हजार217, 16 एप्रिलला 8 हजार839, 17 एप्रिलला 8 हजार834, 18 एप्रिलला 8 हजार479, 19 एप्रिलला 7 हजार381, 20 एप्रिलला 7 हजार214, 21 एप्रिलला 7 हजार684, 22 एप्रिलला 7 हजार410, 23 एप्रिलला 7 हजार221, 24 एप्रिलला 5 हजार888, 25 एप्रिलला 5 हजार542, 26 एप्रिलला 3 हजार876, 27 एप्रिलला 4 हजार014, 28 एप्रिलला 4 हजार966, 29 एप्रिलला 4 हजार192, 30 एप्रिलला 3 हजार925, 1 मे रोजी 3 हजार908, 2 मे रोजी 3 हजार672 नवे रुग्ण आढळून आले आहेत.


या दिवशी कमी रुग्णांची नोंद -
मुंबईत मार्च पासून कोरोनाचा प्रादुर्भाव आहे. मुंबईत 7 नोव्हेंबरला 576, 10 नोव्हेंबरला 535, 16 नोव्हेंबरला 409, 18 जानेवारीला 395, 24 जानेवारीला 348, 26 जानेवारीला 342, 1 फेब्रुवारीला 328 म्हणजेच सर्वात कमी रुग्ण आढळून आले आहेत.


ABOUT THE AUTHOR

...view details