मुंबई -आज राज्यात ३,५५६ नवीन कोरोना रुग्णांचे निदान झाले आहे. यामुळे कोरोनाग्रस्तांचा आकडा १९,७८,०४४ वर पोहोचला आहे. तर आज ७० कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून, कोरोनामुळे राज्यात आतापर्यंत एकूण ५०,२२१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.५४ टक्के एवढा असल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.
राज्यात आज 3 हजार 556 नवे कोरोनाबाधित - State Corona Latest News
आज राज्यात ३,५५६ नवीन कोरोना रुग्णांचे निदान झाले आहे. यामुळे कोरोनाग्रस्तांचा आकडा १९,७८,०४४ वर पोहोचला आहे. तर आज ७० कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून, कोरोनामुळे राज्यात आतापर्यंत एकूण ५०,२२१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
राज्यात आज 3 हजार 556 नवे कोरोनाबाधित
52 हजार 365 रुग्णांवर उपचार
आज राज्यात ३,००९ जणांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे कोरोनावर मात केलेल्यांचा आकडा १८,७४,२७९ वर पोहोचला आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४.७५ टक्के एवढे असून, सध्या 52 हजार 365 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. कोरोनाचे निदान करण्यासाठी आतापर्यंत १,३५,६२,१९४ चाचण्या करण्यात आल्या आहेत.