महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कोरोनाचा कहर : राज्यातील बाधितांचा आकडा २२० वर; आज १७ नवीन रुग्णांची नोंद - कोरोना व्हायरस बातमी

आज एका ७८ वर्षीय पुरुषाचा मुंबईतील खाजगी रुग्णालयात मृत्यू झाला. त्यांना उच्च रक्तदाब, हृदयरोग असे आजारही होते. तर ५२ वर्षीय पुरुषाचा पुण्यातील खाजगी रुग्णालयात मृत्यू झाला. त्यांना मधुमेह, उच्च रक्तदाबाचा त्रास होता. या दोन मृत्यूमुळे राज्यातील करोना बाधित मृत्यूची संख्या आता १० झाली आहे.

today-17-new-patient-found-of-corona-virus-says-rajesh-tope
राजेश टोपे

By

Published : Mar 30, 2020, 7:44 PM IST

मुंबई- जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. राज्यातही कोरोना विषाणू झपाट्याने पसरत आहे. राज्यात कोरोनाच्या आज १७ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे आता राज्यात कोरोनाचा आकडा २२० वर पोहचला आहे. या नवीन रुग्णांमध्ये ८ रुग्ण मुंबईचे असून ५ रुग्ण पुण्याचे, २ नागपूरचे तर नाशिक आणि कोल्हापूर येथील प्रत्येकी १ रुग्ण आहे. तर करोना पासून बरे झालेल्या एकूण ३९ रुग्णांना आतापर्यंत घरी सोडण्यात आले आहे. तर आज २ करोना बाधितांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे सध्या राज्यात १७१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

हेही वाचा-'या' महामारीनंतरचे आर्थिक संकट उंबरठ्यावर आहे'

आज एका ७८ वर्षीय पुरुषाचा मुंबईतील खाजगी रुग्णालयात मृत्यू झाला. त्यांना उच्च रक्तदाब, हृदयरोग असे आजारही होते. तर ५२ वर्षीय पुरुषाचा पुण्यातील खाजगी रुग्णालयात मृत्यू झाला. त्यांना मधुमेह, उच्च रक्तदाबाचा त्रास होता. या दोन मृत्यूमुळे राज्यातील करोना बाधित मृत्यूची संख्या आता १० झाली आहे.


राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय पॉझिटिव्ह रुग्णांचा तपशील -
मुंबई- ९२, पुणे (शहर व ग्रामीण भाग) ४३, सांगली २५, मुंबई वगळून ठाणे मंडळातील इतर मनपा - २३, नागपूर-१६, यवतमाळ- ४, अहमदनगर - ५, सातारा, कोल्हापूर - २, औरंगाबाद, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गोंदिया, जळगाव, बुलढाणा, नाशिक प्रत्येकी- १.


मुंबई येथील आणखी काही रुग्णांचे नमुना तपासणी अहवाल अप्राप्त असल्याने त्यांचा अंतर्भाव आजच्या अहवालात करण्यात आलेला नाही. राज्यात आज एकूण ३२८ जण विविध रुग्णालयात भरती झाले आहेत. १८ जानेवारी पासून ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणे आढळल्याने राज्यातील वेगवेगळ्या विलगीकरण कक्षात आजपर्यंत ४ हजार ५३८ जणांना भरती करण्यात आले. त्यापैकी ३ हजार ८७६ जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना निगेटिव्ह आले आहेत. तर २२० जण पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १९ हजार १६१ व्यक्ती घरगुती अलगीकरणात असून १ हजार २२४ जण संस्थात्मक क्वारंटाईन आहेत.

आतापर्यंत ३९ करोना बाधित रुग्णांना बरे झाल्याने रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. मुंबई- १४, पुणे- ७, पिंपरी चिंचवड- ९, यवतमाळ- ३, अहमदनगर- १, नागपूर- ४, औरंगाबाद- १ असे घरी सोडण्यात आलेल्या रुग्णांची संख्या आहे.

कोरोना विषाणूचा प्रतिबंध व नियंत्रण पूर्वतयारी म्हणून राज्यात सर्व जिल्हा रुग्णालये तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये विलगीकरण कक्ष स्थापन करण्यात आले आहेत, अशीही माहिती टोपे यांनी दिली.

ABOUT THE AUTHOR

...view details