मुंबई - राज्यात कोरोनाची दुसरी लाट तसेच रुग्णसंख्या आटोक्यात आली आहे. राज्यात गुरुवारी (21 ऑक्टोबर) 1573 नव्या रुग्णांची वाढ झाली आहे, तर 39 मृत्यूंची नोंद झाली आहे. गुरुवारी 2 हजार 968 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यात रुग्ण बरे होण्याचा दर 97.46 टक्के तर मृत्युदर 2.12 टक्के इतका आहे.
हेही वाचा -देशातील 100 कोटी कोरोना लसीकरणात राज्याचा मोठा वाटा- राजेश टोपे
राज्यात गुरुवारी 1573 नवीन कोरोना रुग्णांचे निदान झाले आहे. यामुळे राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 65 लाख 98 हजार 218 वर पोहचला आहे. गुरुवारी 39 रुग्णांचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा 1 लाख 39 हजार 925 वर पोहचला आहे. राज्यात गुरुवारी 2 हजार 968 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आल्याने राज्यातील रुग्ण बरे होण्याचा आकडा 64 लाख 30 हजार 394 वर पोहचला आहे. रुग्ण बरे होण्याचा दर 97.46 टक्के तर मृत्यूदर 2.12 टक्के आहे.
आजपर्यंत 6 कोटी 14 लाख 94 हजार 090 चाचण्या करण्यात आल्या आहेत. एकूण करण्यात आलेल्या चाचण्यांपैकी 10.73 टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात सध्या 2 लाख 1 हजार 165 व्यक्ती होम क्वारंटाइनमध्ये असून 24 हजार 292 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.
- रुग्ण, मृत्यूसंख्येत चढउतार -
26 ऑगस्टला 5 हजार 108, 9 सप्टेंबरला 4 हजार 219, 1 ऑक्टोबरला 3105, 4 ऑक्टोबरला 2026, 11 ऑक्टोबरला 1736, 14 ऑक्टोबरला 2384, 15 ऑक्टोबरला 2149, 16 ऑक्टोबरला 1553, 17 ऑक्टोबरला 1715, 18 ऑक्टोबरला 1485, 19 ऑक्टोबरला 1638, 20 ऑक्टोबरला 1825, 21 ऑक्टोबरला 1573 रुग्ण आढळून आले आहेत. तर 28 जुलैला 286, 4 ऑक्टोबरला 26, 5 ऑक्टोबरला 39, 6 ऑक्टोबरला 90, 10 ऑक्टोबरला 28, 11 ऑक्टोबरला 36, 12 ऑक्टोबरला 43, 13 ऑक्टोबरला 49, 14 ऑक्टोबरला 35, 15 ऑक्टोबरला 29, 16 ऑक्टोबरला 26, 17 ऑक्टोबरला 29, 18 ऑक्टोबरला 27, 19 ऑक्टोबरला 49, 20 ऑक्टोबरला 21, 21 ऑक्टोबरला 39 मृत्यूंची नोंद झाली आहे. राज्यात रुग्ण आणि मृत्यू संख्येत चढउतार पाहायला मिळत आहे.
- या विभागात सर्वाधिक रुग्ण -
मुंबई महापालिका - 427
अहमदनगर - 185
पुणे - 191
पुणे पालिका - 86
पिंपरी चिंचवड पालिका - 61
हेही वाचा -VIDEO : पंतप्रधान मोदींनी केली दिव्यांग मुलीशी बातचित, भारताने पार केला 100 कोटी लसीकरणाचा टप्पा