महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'राज्यात नवीन १ हजार २३० कोरोनोग्रस्तांची नोंद, एकूण संख्या २३ हजार ४०१'

आज राज्यात नवीन १ हजार २३० कोरोनाग्रस्तांची नोंद झाली. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या २३ हजार ४०१ झाली आहे.

rajesh tope
आरोग्यमंत्री राजेश टोपे

By

Published : May 11, 2020, 10:49 PM IST

मुंबई- राज्यात दिवसेंदिवस कोरोनाग्रस्तांची संख्या वाढतच चालली आहे. आज राज्यात नवीन १ हजार २३० कोरोनाग्रस्तांची नोंद झाली. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या २३ हजार ४०१ झाली आहे. आज राज्यात आज ५८७ कोरोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले असून, आतापर्यंत ४ हजार ७८६ रुग्ण बरे झाले असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.


आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या २ लाख १८ हजार ९१४ नमुन्यांपैकी १ लाख ९३ हजार ४५७ जणांचे प्रयोगशाळा नमुने निगेटिव्ह आले आहेत, तर २३ हजार ४०१ जण पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात २ लाख ४८ हजार ३०१ लोक होम क्वारंटाईनमध्ये असून १५ हजार १९२ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
आज राज्यात ३६ करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एकूण संख्या ८६८ झाली आहे. आज झालेल्या मृत्यूपैकी मुंबई मधील २०, सोलापूर शहरात ५, पुण्यात ३ , ठाणे शहरात २, अमरावती जिल्ह्यात १, औरंगाबाद शहरात १, नांदेड शहरात १, रत्नागिरी मध्ये १ तर वर्धा जिल्ह्यात १ मृत्यू झाला आहे. याशिवाय उत्तर प्रदेशमधील एकाचा मुंबईत मृत्यू झाला आहे.

आज झालेल्या मृत्यूंपैकी २३ पुरुष तर १३ महिला आहेत. आज झालेल्या ३६ मृत्यूपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील १७ रुग्ण आहेत तर १६ रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत. तर ३ जण ४० वर्षांखालील आहे. या ३६ रुग्णांपैकी २७ जणांमध्ये ( ७५ टक्के ) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत.


जिल्हा व मनपानिहाय रुग्णांचा तपशील: (कंसात मृत्यूंची आकडेवारी)*

मुंबई महानगरपालिका: १४,५२१ (५२८)
ठाणे: १२५ (२)
ठाणे मनपा: ९२७ (१०)
नवी मुंबई मनपा: ८९८ (४)
कल्याण डोंबिवली मनपा: ३६६ (३)
उल्हासनगर मनपा: ३०
भिवंडी निजामपूर मनपा: ३२ (२)
मीरा भाईंदर मनपा: २१४ (२)
पालघर: ३७ (२)
वसई विरार मनपा: २४९ (१०)
रायगड: १२३ (१)
पनवेल मनपा: १३९ (२)
*ठाणे मंडळ एकूण: १७,६६१ (५६६)*
नाशिक: ६०
नाशिक मनपा: ४०
मालेगाव मनपा: ५९५ (३४)
अहमदनगर: ५४ (३)
अहमदनगर मनपा: ०९
धुळे: ९ (३)
धुळे मनपा: ४५ (३)
जळगाव: १४५(१२)
जळगाव मनपा: ३५ (७)
नंदूरबार: २२ (२)
*नाशिक मंडळ एकूण: १०१५ (६४)*
पुणे: १६६ (५)
पुणे मनपा: २४७८ (१४९)
पिंपरी चिंचवड मनपा: १४७ (४)
सोलापूर: ९
सोलापूर मनपा: २८७ (१६)
सातारा: १२१ (२)
*पुणे मंडळ एकूण: ३२०६ (१७६)*
कोल्हापूर: १३ (१)
कोल्हापूर मनपा: ६
सांगली: ३३
सांगली मिरज कुपवाड मनपा: ४ (१)
सिंधुदुर्ग: ६
रत्नागिरी: ४२ (२)
*कोल्हापूर मंडळ एकूण: १०४ (४)*
औरंगाबाद:९३
औरंगाबाद मनपा: ४९१ (१४)
जालना: १४
हिंगोली: ६०
परभणी: १ (१)
परभणी मनपा: १
*औरंगाबाद मंडळ एकूण: ६६० (१५)*
लातूर: २६ (१)
लातूर मनपा: ५
उस्मानाबाद: ३
बीड: १
नांदेड: ४
नांदेड मनपा: ४१ (४)
*लातूर मंडळ एकूण: ८० (५)*
अकोला: १८ (१)
अकोला मनपा: १४४ (१०)
अमरावती: ५ (२)
अमरावती मनपा: ७८ (११)
यवतमाळ: ९७
बुलढाणा: २५ (१)
वाशिम: १
*अकोला मंडळ एकूण: ३६८ (२५)*
नागपूर: २
नागपूर मनपा: २५७ (२)
वर्धा: १ (१)
भंडारा: १
गोंदिया: १
चंद्रपूर: १
चंद्रपूर मनपा: ३
गडचिरोली: ०
*नागपूर मंडळ एकूण: २६६ (३)*
इतर राज्ये: ४१ (१०)
*एकूण: २३ हजार ४०१ (८६८)*


(टीप - आय सी एम आर पोर्टलवर दर्शविलेल्या बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील दिनांक ७ मे २०२० पासूनच्या ३०८ रुग्णांचा समावेश रिकॉन्सिलिएशन अभावी वरील तक्त्यामध्ये करण्यात आलेला नाही. ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर. पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड१९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)


राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत, त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेनमेंट कृतीयोजना अंमलात आणण्यात येत आहे. राज्यात सध्या १ हजार २५६ कंटेनमेंट झोन क्रियाशील असून आज एकूण १२ हजार २७ सर्वेक्षण पथकांनी काम केले असून त्यांनी ५३.७१ लाख लोकसंख्येचे सर्वेक्षण केलेले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details