मुंबई - दिवसेंदिवस राज्यासह मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच आहे. आज (सोमवार) पुन्हा मुंबईत कोरोनाचे १ हजार १८५ नवे रुग्ण आढळून आल्याने कोरोनाग्रस्तांचा आकडा २१ हजार १५२ वर पोहोचला आहे. तसेच, मुंबईत आज २३ जणांचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा ७५७ वर पोहोचला आहे. तर मुंबईतून ५०४ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आल्याने, डिस्चार्ज देण्यात येणाऱ्या रुग्णांची संख्या ५ हजार ५१६ वर पोहोचली असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.
मुंबईमधील कोरोनाग्रस्तांची संख्या २१ हजारांवर, आज आढळले १,१८५ नवे रुग्ण - mumbai corona
दिवसेंदिवस राज्यासह मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच आहे. आज (सोमवार) पुन्हा मुंबईत कोरोनाचे १ हजार १८५ नवे रुग्ण आढळून आल्याने कोरोनाग्रस्तांचा आकडा २१ हजार १५२ वर पोहोचला आहे.
![मुंबईमधील कोरोनाग्रस्तांची संख्या २१ हजारांवर, आज आढळले १,१८५ नवे रुग्ण mumbai](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-7253568-434-7253568-1589819505342.jpg)
मुंबईत आज कोरोनाचे नवे १ हजार १८५ रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी ८८५ रुग्ण गेल्या २४ तासात आढळून आले आहेत. तर १२ ते १६ मे दरम्यान खासगी लॅबमध्ये टेस्ट केलेले ३०० रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. मुंबईत झालेल्या २३ मृत्यूंपैकी १३ जणांना दिर्घकालीन आजार होते. २३ पैकी १८ पुरुष तर ५ महिला रुग्ण होते. मृतांपैकी ३ जणांचे वय ४० वर्षाखाली, ११ जणांचे वय ६० वर्षावर तर ९ जणांचे वय ४० ते ६० वर्षा दरम्यान होते. मुंबईमधून ५०४ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आल्याने डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या ५ हजार ५१६ वर पोहोचली असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.