मुंबई - दिवसेंदिवस मुंबईत कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत आहे. आज (शुक्रवार) मुंबईत 1 हजार 62 नवे कोरोनाचे रुग्ण आढळून आले. यामुळे मुंबईमधील कोरोनाग्रस्तांचा आकडा 1 लाख 6 हजार 891 वर पोहोचला आहे तर मृतांचा आकडा 5 हजार 981 वर पोहोचला आहे. मुंबईमधून आज एकाच दिवशी 1 हजार 158 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. मुंबईत आतापर्यंत एकूण 78 हजार 260 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आल्याने सध्या 22 हजार 647 सक्रिय रुग्ण आहेत. मुंबईमधील रुग्ण बरे होण्याचा दर 73 टक्क्यांवर पोहोचला आहे. तर रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 64 दिवसांवर पोहोचला आहे.
जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोना विषाणूमुळे मुंबईत आज 54 जणांचा मृत्यू झाला. त्यापैकी 37 रुग्णांना दिर्घकालीन आजार होते. मृतांमध्ये 37 पुरुष तर 17 महिला रुग्ण आहेत. मुंबईतून आज 1 हजार 158 रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. यामुळे डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांचा आकडा 78 हजार 260 वर पोहोचला आहे.
मुंबईत आज 1 हजार 62 नवे रुग्ण, तर 1 हजार 158 रुग्णांची कोरोनावर मात
दिवसेंदिवस मुंबईत कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत आहे. आज (शुक्रवार) मुंबईत 1 हजार 62 नवे कोरोनाचे रुग्ण आढळून आले. यामुळे मुंबईमधील कोरोनाग्रस्तांचा आकडा 1 लाख 6 हजार 891 वर पोहोचला आहे तर मृतांचा आकडा 5 हजार 981 वर पोहोचला आहे. मुंबईमधून आज एकाच दिवशी 1 हजार 158 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
मुंबईत आज 1 हजार 62 नवे रुग्ण
मुंबईत कोरोनाचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 73 टक्क्यांवर पोहोचले आहे. रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 64 दिवस तर सरासरी दर 1.09 टक्के आहे. मुंबईत सध्या कोरोनाचे रुग्ण आढळून आलेल्या 625 चाळी आणि झोपडपट्टी कंटेमेंट झोन घोषित करून सिल करण्यात आल्या आहेत. तसेच 6 हजार 108 इमारती व इमारतीच्या विंग, काही मजले सिल करण्यात आले आहेत. कोरोनाचे निदान करण्यासाठी 4 लाख 62 हजार 721 इतक्या चाचण्या करण्यात आल्या आहेत.