मुंबईत कोरोनाचे 2211 नवे रुग्ण; 3370 जण कोरोनामुक्त - Corona in mumbai
मुंबईत आज (बुधवारी) कोरोनाचे 2 हजार 211 नवे रुग्ण आढळून आले असून 48 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दुसरीकडे आज 3 हजार 370 रुग्णांनी कोरोनावर मात केल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.
मुंबई - शहरात मार्चपासून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव सुरू झाला आहे. कोरोनाचा प्रसार काही प्रमाणात आटोक्यात आला असताना ऑगस्ट महिन्यात आलेल्या धार्मिक सणानंतर सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीपासून रुग्णांचा संख्येत पुन्हा वाढ होऊ लागली आहे. आज मुंबईत कोरोनाच्या नव्या 2 हजार 211 रुग्णांची नोंद झाली असून 48 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर आज 3 हजार 370 रुग्णांनी कोरोनावर मात केल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.
मुंबईत आज (बुधवारी) कोरोनाचे 2 हजार 211 नवे रुग्ण आढळून आले असून 48 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी 44 रुग्णांना दिर्घकालीन आजार होते. मृतांमध्ये 29 पुरुष तर 19 महिला रुग्ण आहेत. मुंबईमधील कोरोनाग्रस्तांचा आकडा 2 लाख 34 हजार 606 वर पोहचला आहे. तर, मृतांचा आकडा 9 हजार 552 वर पोहचला आहे. मुंबईमधून आज 3 हजार 370 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. मुंबईत डिस्चार्ज देण्यात आलेल्यांचा आकडा 2 लाख 01 हजार 497 वर गेला आहे. सध्या मुंबईत 20 हजार 790 सक्रिय रुग्ण आहेत.
मुंबईत कोरोनाचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 85 टक्क्यांवर पोहचले आहे. रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 73 दिवस तर सरासरी दर 0.95 टक्के आहे. मुंबईत सध्या कोरोनाचे रुग्ण आढळून आलेल्या 650 चाळी आणि झोपडपट्टी कंटेनमेंट झोन घोषित करून सील करण्यात आल्या आहेत. तसेच 9 हजार 799 इमारती व इमारतीच्या विंग, काही मजले सील करण्यात आले आहेत. तर, कोरोनाचे निदान करण्यासाठी 12 लाख 93 हजार 994 इतक्या चाचण्या करण्यात आल्या आहेत.