मुंबई - महाविकास आघाडीचा हा पाहिलाच अर्थसंकल्प आहे. महाराष्ट्रातील साडे अकरा कोटी जनतेच्या अपेक्षा पूर्ण करणे आव्हानात्मक आहे. मात्र, तरीही आम्ही उत्तम आणि सर्वसमावेशक अर्थसंकल्प आज मांडणार आहोत, असे प्रतिपादन अन्न व औषध पुरवठा मंत्री राजेंद्र शिंगणे यांनी केले.
सर्वांच्या दृष्टीने हा अर्थसंकल्प उपयुक्त ठरेल. रोजगार आणि महसूल विभांगांकडे लक्ष देण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. प्रत्येक खात्याकडून मोठ्या प्रमाणात महसूल निर्माण करण्यावर भर दिला जाईल. जिल्हा आणि तालुका स्तरांवर रोजगार तरुणांसाठी महाविकास आघाडी सरकार करेल, असेही शिंगणे म्हणाले.