त्वचेला नवसंजीवनी देणारी टिश्यू बँक राज्यात सुरू मुंबई -भारतीय क्रिकेट संघातील क्रिकेटपटू ऋषभ पंत ( Cricketer Rishabh Pant ) याचा नुकत्याच अपघात ( Cricketer Rishabh Pant accident ) झाला .डॉक्टरांनी त्याला प्लास्टिक सर्जरी करायला सांगितले. अशा वेळेला आपल्या शरीराची त्वचा काढून आपल्याच शरीराच्या जळालेल्या भागावर किंवा खराब झालेल्या भागावर बसवली ( Tissue bank started in the state ) जाते. पण यामुळे पुन्हा जखम होते म्हणून याच्यावर महत्त्वाचा उपाय शोधला गेला आहे. महाराष्ट्रात केईएम रुग्णालयामध्ये ( KEM Hospital ) त्वचा तसचे टिश्यू बँक (Tissue bank for skin ) सुरू झाली आहे; जाणून घेऊया सविस्तरपणे.
केईएम रुग्णालयात संशोधन - बऱ्याचदा अपघातात शरीराला इजा होते. किंवा शरीराचा भाग भाजला जातो. छोटी मोठी घटना असेल तर आपल्या शरीरावरची त्वचा महिना पंधरा दिवस वा दोन महिन्यात पूर्वत होते. मात्र मोठा अपघात असल्यास ही त्वचा लवकर पूर्णपणे बरी होत नाही आणि यावरच उपाय शोधलाय वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञांनी. के एम मधील डॉक्टर विनिता पुरी यांनी आता केएम रुग्णालयामध्ये यासंदर्भात अभ्यास आणि संशोधन केले. यामुळे कोणत्याही भाजलेल्या व्यक्तीला आता नवजीवन प्राप्त होणार आहे.
त्वचेचं दान करता येणार - जळालेल्या अवस्थेमध्ये व्यक्तीला रुग्णालयामध्ये आणलं जातं आणि त्याच्यावर उपचार केले जातात परंतु त्याच्या शरीराचा भाग जळालेला असतो आणि तो पुन्हा पहिल्यासारखा करण्यासाठी तिथे त्वचा लावणं गरजेचं आहे. आणि ही त्वचा जर त्याच्या शरीरातून काढली तर पुन्हा त्याच्या शरीराला दुसऱ्या ठिकाणी जखम होते .म्हणून दुसऱ्या व्यक्तीची त्वचा ही त्या व्यक्तीला लावता येते ज्या पद्धतीने डोळ्याचं दान केलं जातं किडनीच दान केलं जातं. यकृताचा दान केलं जातं .तसं आता कोणालाही त्वचेचं दान या ठिकाणी करता येणार आहे.
कसं केलं जाऊ शकतात त्वचेचा दान - कुठली व्यक्ती मृत्यू पावते त्याच्या आधीच जर त्या व्यक्तीने संबंधित आरोग्य यंत्रणेला अर्ज भरून आधी कळवलेला असेल, तर मृत्यू झाल्यानंतर सहा तासाच्या आत वैद्यकीय तज्ञांची एक टीम त्या व्यक्तीच्या घरी येते .आणि वैद्यकीय चाचण्या आधी करते .वैद्यकीय नियमानुसार त्या व्यक्तीची शारीरिक स्थिती आरोग्य कसे आहे हे पाहिले जाते. जर ती त्वचा वैद्यकीय दृष्टीने उपयोगी असेल तर ती त्वचा ते काढतात. त्वचा बँकमध्ये केईम रुग्णालयामध्ये अत्यंत आधुनिक तंत्रज्ञान वापरून ती जतन केली जाते. ही त्वचा दुसऱ्या कुठल्याही रुग्ण व्यक्तीला कामास येऊ शकते.
त्वचाच्या सोबत गर्भजल अस्तर बँक केएम रुग्णालयमध्ये सुरू -कुठल्याही बाळाचा जन्म होतो त्या वेळेला बाळाच्या जन्म होताना पातळसा अस्तर भाग बाळाच्या नाळेसकट नंतर उपयोगात आणत नाही. त्याला गर्भजल पण म्हणतात. कुठल्याही महिलेचे बाळंतपण झाल्यावर एक पातळ अस्तर ज्याला पातळ पडदा म्हणता येईल. ती वाया जाते. ती उपयोगात आणली जात नाही. ती फेकणे ऐवजी जर ते गर्भजल अस्तर जतन केले; तर त्याचा कोणत्याही जखमी रुग्णांना उपयोग होऊ शकतो. सरकारी रुग्णालयामध्ये या प्रकारच्या अत्याधुनिक सोयी सुविधा मिळणं हे खरं भारतीय वैद्यकीय क्षेत्रामधील एक महत्त्वाचं पाऊल आहे.
अत्याधुनिक तंत्रज्ञानाने त्वचा जतन-केईएम रुग्णालयाच्या डीन डॉक्टर संगीता रावत यांनी ईटीव्ही भारत सोबत याबद्दल माहिती विशद केली; "आम्ही त्वचा बँक सोबत सर्व प्रकारच्या टिशू बँक देखील आता सुरू करत आहोत. ज्याला आम्ही इंग्रजीमध्ये एमिनिओटीक मेमरिन म्हणतात. त्याची देखील बँक आम्ही आता सुरू केलेली आहे. एखाद्या व्यक्ती त्याच्या शरीराचा भाग जळतो. खूप जखम होते तर त्याला नवीन त्वचेची गरज असते. तर या त्वचा बँक मधून त्याला त्वचा मिळेल. या ठिकाणी अत्याधुनिक तंत्रज्ञानाने त्वचा जतन केली जाते.
त्वचा बँकमुळे रुग्णाला वरदान - मग रुग्णाला तिचा उपयोग होऊ शकतो. जो रुग्ण जळालेल्या अवस्थेत असतो. त्याच्या शरीरावरून त्वचा काढून त्याच्या जखमेच्या ठिकाणी ती लावावी लागते. त्याच्यामुळे त्याला पुन्हा दुसऱ्या ठिकाणी जखम होते. परंतु या त्वचा बँकमुळे आता त्या रुग्णाला वरदान मिळणार आहे. तसेच महिलेचे बाळंतपण होत असताना त्याच्यातून जे एमनिओटीक मेमरीन हे वापरात येत नाही. ते टाकून दिलं जातं. जे नाळेच्या सोबत येतं, जे पातळ असं अस्तर सारखा असतं. त्याला गर्भजल देखील म्हणतात तर त्याची देखील बँक आम्ही आता सुरू केलेली आहे."
गर्भजल जतन करणार - तर प्रत्यक्ष या विषयावर संशोधन करणाऱ्या डॉक्टर विनिता पुरी यांनी अथक प्रयत्न, अभ्यास संशोधन करून ही त्वचा बँक सुरू करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांचं म्हणणं आहे की," हे वैद्यक क्षेत्रामधील मोठं पाऊल आहे. डॉक्टर माधवी गोरे यांनी यासंदर्भात आधी प्रयत्न केला होता. त्यांच्यात मार्गदर्शनामुळे आम्ही आता यात काही योगदान देत आहोत. जळालेले रुग्ण असतील त्यांच्यासाठी आम्ही टिशू बँक देखील सुरू करत आहोत. म्हणजेच त्वचा त्या व्यक्तीला चांगली मिळू शकेल. तसंच बाळंतपण होत असताना बाळाची नाळ त्याबरोबर आईच्या शरीरातून एक अस्तर गर्भजल सारखं बारीक जो स्तर आहे. तो निघतो आणि तो टाकून दिला जातो. मात्र तो आम्ही जतन करणार आहोत.
गर्भजल अस्तराचा उपयोग -ज्यामुळे कोणत्याही रुग्ण महिलांना पुरुषांना देखील त्याचा फायदा होऊ शकेल. कोणत्याही व्यक्तीला कुठलीही गंभीर जखम झाली असेल तर जखम सुधारण्यासाठी या गर्भजल अस्तराचा उपयोग होतो.ज्याला एमनिओटीक मेमरिन म्हणतात. कारण याच्यामध्ये जंतू रोधक नैसर्गिक काही तत्व यामध्ये आहे आणि त्वचा पूर्वत आणण्यासाठीची नैसर्गिक ताकद यामध्ये आहेत.