मुंबई -अभिनेता इरफान खान आणि ऋषी कपूर यांच्या निधनानंतर सिनेजगतामध्ये शोककळा पसरली. मात्र, या दु: खी वातावरणातून चाहत्यांचे लक्ष खेचून घेण्यासाठी रविवारी बिग बी अमिताभ बच्चन यांनी 1977 ला प्रदर्शीत झालेल्या 'अमर अकबर अँथनी' या सुपरहीट चित्रपटातील एक दृश्य प्रदर्शित केले, ज्यात ते स्वत: च स्वत: शी संवाद करताना दिसत आहेत.
बिग बी म्हणतात.. वेळ झालीय दु: खातून बाहेर पडण्याची - बिग बी
2 मिनिटे आणि 19 सेकंदाच्या व्हिडिओमध्ये अमिताभ बच्चन हे दारू पिलेल्या अवस्थेत आरशासमोर उभे राहिलेले दिसतात आणि स्वत: च स्वत: शी संवाद करतात. हा व्हिडिओ गंमतीशीर असला तरी बिग बींनी चाहत्यांच्या चेहऱ्यावरील हास्य पुन्हा आणण्याचा प्रयत्न केला आहे.

अमिताभ बच्चन यांनी एक ट्वीट करून सांगितले, की सध्याचे दु:ख हे शेवटचं असू शकतं. आता वेळ झालीय यातून बाहेर पडायची पूर्वस्थितीत यायची आणि चेहऱ्यावरील हास्य पुन्हा आणण्याची.
2 मिनिटे आणि 19 सेकंदाच्या व्हिडिओमध्ये अमिताभ बच्चन हे दारू पिलेल्या अवस्थेत आरशासमोर उभे राहिलेले दिसतात आणि स्वत: च स्वत: शी संवाद करतात. हा व्हिडिओ गंमतीशीर असला तरी बिग बींनी चाहत्यांच्या चेहऱ्यावरील हास्य पुन्हा आणण्याचा प्रयत्न केला आहे. अमर अकबर अँथनी या 1977च्या चित्रपटामध्ये ऋषी कपूर आणि विनोद खन्ना यांनीही काम केले आहे.