महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Assembly Session 2023 : गिरणी कामगारांच्या घरांचे प्रश्न सोडवण्यासाठी काल मर्यादा निश्चित करणार - अतुल सावे - Atul Save

गिरणी कामगारांच्या घरांचे प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत. या संदर्भात लवकरच एक बैठक घेण्यात येईल आणि हे प्रश्न सोडवण्यासाठी काल मर्यांदा निश्चित केली जाईल अशी माहिती गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी आज विधानसभेत दिली आहे.

Assembly Session 2023
पावसाठी अधिवेशन 2023

By

Published : Jul 28, 2023, 4:30 PM IST

मुंबई : गिरणी कामगारांच्या घराच्या प्रश्नावर कॉंग्रेसचे जेष्ठ नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी विधानसभेत लक्षवेधी मांडली होती. या संदर्भातील प्रश्नांना गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी उत्तर दिले. महाराष्ट्राच्या काना कोपऱ्यातून नौकरीच्या निमित्ताने मुंबईत आलेले गिरणी कामगार हे खरे मुंबईचे निर्माते आहेत. त्यांच्या हक्काच्या घराचा प्रश्न सुटावा यासाठी शासनाने कालमर्यादा निश्चित करावी आणि सकारात्मक रित्या हा प्रश्न सोडवावा अशी मागणी त्यांनी सभागृहात केली.

यासंदर्भात प्रश्न मांडताना बाळासाहेब थोरात म्हणाले की, पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असतानाच्या काळात हा प्रश्न प्रामुख्याने समोर आला होता. महसूल मंत्री या नात्याने माझ्याकडे हा प्रश्न हाताळण्याची जवाबदारी होती आम्ही या प्रश्नावर मार्ग काढण्याच्या निमित्ताने खूप कामही केले आणि पुढे गेलो. मात्र अद्यापही घराचा प्रश्न प्रलंबित आहे. तेव्हा गिरणी कामगारांच्या प्रश्नावर राजकारण म्हणून न पाहत सकारात्मक तोडगा काढने महत्वाचे आहे.

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून नोकरी धंद्याच्या निमित्ताने ही लोक मुंबईत आली, स्थिरस्थावर झाली, त्यांनी मुंबई उभी करण्यात हातभार लावला. त्यामुळे हा प्रश्न सोडवण्यासाठी कालमर्यादा निश्चित करणे गरजेचे आहे. यावर मंत्री अतुल सावे यांनी सांगितले की हा प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही सकारात्मक आहोत आणि लवकरच एक बैठक घेउन प्रश्न सोडवण्या संदर्भात ष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी सांगितलेल्या सूचनेप्रमाणे निश्चित कालमर्यादेतला कार्यक्रम आखला जाईल, त्या बैठकीलाही बाळासाहेब थोरात यांनाही बोलावूले जाईल आणि हा प्रश्न मार्गी लावू.

गिरणी कामगारांच्या घराचा प्रश्न अनेक वर्षांपासीन प्रलंबित आहे. हा प्रश्न सुटावा या मागणी साठी कामगार आणि त्यांच्या संघटनांनी रस्त्यावर उतरुन आंदोलनेही केली. दर वेळी त्यांना प्रश्न सोडवण्याचे अश्वासन मिळते पण त्यांचे प्रस्न मिटलेले नाहीत. ज पर्यंत झालेल्या चार सोडतींमधे सुमारे 16 हजार कामगारांना घरे मिळालेली आहेत. मात्र अजुनही घरांसाठी अर्ज केलेल्या 1 लाख 75 हजार कमगारांना घरे मिळालेली नाहीत. घरे मिळावीत अन्यथा घरांसाठी प्रस्तावित 110 एकर जमीन लवकरात लवकर म्हाडा कडे सुपिर्द करण्यात यावी. सिडकोने खारघर येथील घरे गिरणी कामगारांना देण्यास मान्यता द्यावी आदी मागण्या गिरणी कामगार संघटना कृती समितीने शासनाकडे वारंवार केलेल्या आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details