मुंबई - मुंबईतील कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी 16 जानेवारीपासून लसीकरण मोहीम सुरू आहे. या मोहिमेनुसार सोमवार ते बुधवार वॉक इन, तर गुरुवार ते शनिवार नोंदणी झालेल्या 45 वर्षावरील नागरिकांचे लसीकरण केले जात आहे. मुंबईत काल (28 मे) 43 हजार 181 लाभार्थ्यांना लस देण्यात आली. 16 जानेवारीपासून आतापर्यंत एकूण 31 लाख 33 हजार 311 लाभार्थ्यांना लस देण्यात आली.
लसीकरणाची आकडेवारी
मुंबईत काल 43 हजार 181 हजार लाभार्थ्यांना लस देण्यात आली. त्यात 41 हजार 192 लाभार्थ्यांना पहिला, तर 1 हजार 989 लाभार्थ्यांना दुसरा डोस देण्यात आला. आतापर्यंत एकूण 31 लाख 33 हजार 311 लाभार्थ्यांना लस देण्यात आली. त्यात 23 लाख 88 हजार 349 लाभार्थ्यांना पहिला तर 7 लाख 44 हजार 962 लाभार्थ्यांना दुसरा डोस देण्यात आला. आतापर्यंत 3 लाख 2 हजार 337 आरोग्य कर्मचारी, 3 लाख 60 हजार 425 फ्रंटलाईन वर्कर, 12 लाख 6 हजार 311 जेष्ठ नागरिक, 11 लाख 13 हजार 059 45 ते 59 वर्षामधील नागरिकांना आणि 18 ते 44 वर्षामधील 1 लाख 50 हजार 642 नागरिकांना लस देण्यात आली. तसेच, 537 स्तनदा मातांनाही लसीचे डोस देण्यात आले आहेत.
लसीकरण मोहीम
मुंबईत कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी 16 जानेवारी 2021 पासून कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली. सुरुवातीला आरोग्य कर्मचारी व फ्रंटलाईन वर्करना लस दिली गेली. 1 मार्चपासून 60 वर्षावरील वयोवृद्ध तसेच 45 ते 59 वर्षामधील विविध गंभीर आजार असलेल्या नागरिकांना लस दिली गेली. 1 मे पासून 18 ते 45 वर्षामधील लाभार्थ्यांचे लसीकरण सुरु झाले आहे.