महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

आतापर्यंत 30 लाख 90 हजार 130 मुंबईकरांचे लसीकरण, काल 41 हजार 130 लाभार्थ्यांनी घेतला लाभ

मुंबईत सध्या सोमवार ते बुधवार वॉक इन, तर गुरुवार ते शनिवार नोंदणी झालेल्या 45 वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण केले जात आहे. 16 जानेवारीपासून आतापर्यंत एकूण 30 लाख 90 हजार 130 मुंबईकरांना लस देण्यात आली.

मुंबई
mumbai

By

Published : May 28, 2021, 3:05 AM IST

मुंबई - मुंबईत 16 जानेवारीपासून कोरोना लसीकरण सुरू आहे. सध्या सोमवार ते बुधवार वॉक इन, तर गुरुवार ते शनिवार नोंदणी झालेल्या 45 वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण केले जात आहे. काल (27 मे) 41 हजार 130 लाभार्थ्यांना लस देण्यात आली. 16 जानेवारीपासून आतापर्यंत एकूण 30 लाख 90 हजार 130 लाभार्थ्यांना लस देण्यात आली.

लसीकरणाची आकडेवारी

मुंबईत काल 41 हजार 130 हजार लाभार्थ्यांना लस देण्यात आली. त्यात 38 हजार 847 लाभार्थ्यांना पहिला, तर 2 हजार 283 लाभार्थ्यांना दुसरा डोस देण्यात आला. आतापर्यंत एकूण 30 लाख 90 हजार 130 लाभार्थ्यांना लस देण्यात आली. त्यात 23 लाख 47 हजार 157 लाभार्थ्यांना पहिला तर 7 लाख 42 हजार 973 लाभार्थ्यांना दुसरा डोस देण्यात आला. आतापर्यंत 3 लाख 2 हजार 242 आरोग्य कर्मचारी, 3 लाख 60 हजार 243 फ्रंटलाईन वर्कर, 12 लाख 864 जेष्ठ नागरिक, 45 ते 59 वर्षामधील 10 लाख 96 हजार 080 नागरिक आणि 18 ते 44 वर्षामधील 1 लाख 30 हजार 188 नागरिकांना लस देण्यात आली. तसेच, 513 स्तनदा मातांनाही लसीचे डोस देण्यात आले आहेत.

लसीकरण मोहीम

मुंबईत कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी 16 जानेवारीपासून लसीकरणाला सुरुवात झाली. सुरुवातीला आरोग्य कर्मचारी व फ्रंट लाईन वर्करना लस दिली जात होती. 1 मार्चपासून 60 वर्षावरील वयोवृद्ध तसेच 45 ते 59 वर्षामधील विविध गंभीर आजार असलेल्या नागरिकांना लस देण्यास सुरूवात झाली. 1 मे पासून 18 ते 45 वर्षामधील लाभार्थ्यांचे लसीकरण सुरु झाले.

विविध गटानुसार लसीकरण

सोमवार ते बुधवार जेष्ठ नागरिक तसेच दिव्यांग यांचे लसीकरण केले जाणार आहे. तर गुरुवार ते शनिवारपर्यंत कोविन अ‍ॅपवर नोंदणी करून मोबाईलवर संदेश आला असेल त्यांनाच लसीकरणाला येण्याचे आवाहन पालिकेने केले आहे. स्तनदा माता आणि गरोदर महिलांचेही लसीकरण केले जाणार आहे.

एकूण लसीकरण

  • आरोग्य कर्मचारी - 3,02,242
  • फ्रंटलाईन वर्कर - 3,60,243
  • जेष्ठ नागरिक - 12,00,864
  • 45 ते 59 वयोगट - 10,96,080
  • 18 ते 44 वयोगट - 1,30,188
  • स्तनदा माता - 513
  • एकूण - 30,90,130

हेही वाचा -शिक्षणच नाही तर फी कशाची?; शैक्षणिक शुल्क माफ करण्याची निवासी डॉक्टरांची मागणी

ABOUT THE AUTHOR

...view details