मुंबईTiger Conservation Efforts: रानडुक्कर आणि इतर प्राण्यांपासून पिके वाचवण्यासाठी शेतकऱ्यांकडून कुंपणात विद्युत प्रवाह सोडण्याचे प्रकार सर्रास आढळतात. यामुळे जंगली प्राणी अथवा अन्य प्राण्यांपासून पिकांचं रक्षण होतं. मात्र, वाघ देखील या कुंपणात अडकतात. विद्युत प्रवाहामुळे अनेक वाघ मृत्यूमुखी पडल्याच्या प्रमाणात वाढ झालीय. त्यामुळे या विद्युत प्रवाहापासून वाघांना वाचवण्यासाठी आता राज्याच्या वनविभागाने तंत्रज्ञानाचा वापर करण्याचं ठरवलं आहे. (technology to save tiger)
ताडोबात प्रायोगिक तत्त्वावर प्रयोग:एक प्रयोग म्हणून, हे तंत्र चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा व्याघ्र प्रकल्पात वापरलं जात आहे. जर हा प्रयोग यशस्वी झाला तर हे तंत्र वाघांच्या इतर अभयारण्यांमध्ये वापरलं जाणार असल्याची माहिती वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. यासंदर्भात अधिक तपशील देताना ते म्हणाले की, "वाघांच्या मृत्यूला रोखण्यासाठी जनजागृती करण्याची गरज आहे. या व्यतिरिक्त आम्ही थर्मल तंत्रज्ञानावर आधारित तंत्रज्ञान वापरत आहोत. ताडोबा व्याघ्र प्रकल्पाच्या आसपासच्या परिसरात प्रायोगिक तत्त्वावर या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. त्याची चाचणी चार महिन्यांपर्यंत केली जाईल. या तंत्राच्या वापराचा अहवाल पाहिल्यानंतर, तो इतर ठिकाणी वापरला जाईल."
काय आहे तंत्रज्ञान?वाघांना व्याघ्र प्रकल्पातून ग्रामीण भागात जाण्यापासून रोखण्यासाठी वाघाच्या रिझर्व्हच्या बाहेर एक अदृश्य सेन्सर बसविला जाईल, असे वनमंत्री म्हणाले. वाघ या सेन्सरमधून बाहेर पडताच संबंधित वन अधिकारी आणि शेतकर्यांना माहिती दिली जाईल. एसएमएसद्वारे किंवा मोबाइल फोनद्वारे याची माहिती देण्यात येईल. जेणेकरून वाघ विजेच्या धक्का बसण्यापासून वाचतील. वाघाने ही 'लक्ष्मण रेखा' ओलांडताच अलार्म वाजणं सुरू होईल. या प्रकल्पाची किंमत 70 कोटी आहे.