महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

धक्कादायक! बंदी असलेल्या टिकटाॅकचा 'व्हिपीएन'द्वारे वापर... - mumbai cyber police news

भारतात चिनी अ‌ॅपच्या माध्यमातून होत असलेल्या हेरगिरी, सायबर हल्ले व सायबर लूटीला घेऊन केंद्र सरकारने टिकटाॅकसह अन्य अ‌ॅपवर बंदी आणली. भारतात जवळपास 15 कोटी टिकटाॅकटचे वापरकर्ते होते. कायदेशीर परवानगी नसतानाही टिकटॉकचा वापर प्रॉक्सी सर्व्हरच्या माध्यमातून करणे हे धोकादायक असल्याचे सायबर एक्सपर्ट अंकुर पुराणिक यांनी म्हटले आहे.

tick-tok-use-thought-vpn-at-mumbai
बंदी असलेल्या टिकटाॅकचा 'व्हिपीएन'द्वारे वापर...

By

Published : Jul 20, 2020, 12:03 PM IST

मुंबई-केंद्र सरकारने देशाच्या सुरक्षिततेला धोका असल्याने 59 चिनी अ‌ॅपवर बंदी घातली. यामध्ये टिकटॉकचाही समावेश आहे. भारताने बंदी लागू केल्यानंतर गुगलने प्ले स्टोअरवरून टिकटॉक अ‌ॅप हटविले आहे, तर अ‌ॅपल कंपनीने स्टोअरवरून टिकटॉक काढून टाकले आहे. त्यामुळे टिकटॉक कंपनीला मोठा फटका बसला आहे. मात्र, काहीजण व्हीपीएन, प्रॉक्सी सर्वरच्या माध्यमातून टिकटाॅकचा वापर करत असल्याचा प्रकार समोर आला आहे.

भारतात चिनी अ‌ॅपच्या माध्यमातून होत असलेल्या हेरगिरी, सायबर हल्ले व सायबर लूटीला घेऊन केंद्र सरकारने टिकटाॅकसह अन्य अ‌ॅपवर बंदी आणली. भारतात जवळपास 15 कोटी टिकटाॅकटचे वापरकर्ते होते. कायदेशीर परवानगी नसतानाही टिकटॉकचा वापर प्रॉक्सी सर्व्हरच्या माध्यमातून करणे हे धोकादायक असल्याचे सायबर एक्सपर्ट अंकुर पुराणिक यांनी म्हटले आहे. कुठल्याही व्हिपीएन (vpn) किंवा प्रॉक्सी सर्व्हरच्या माध्यमातून टिकटॉक अ‌ॅप डाऊनलोड केल्यास मोबाईल, संगणक, लॅपटॉपमध्ये मालवेअर व्हायरस पोहोचू शकतो. याद्वारे देशाबाहेर बसलेले सायबर गुन्हेगार तुमच्या मोबाईलमधील फोन नंबर, लोकेशन, तुमची वैयक्तिक माहिती चोरी करू शकतात.

बंदी असलेल्या टिकटाॅकचा 'व्हिपीएन'द्वारे वापर...
गेल्या 6 महिन्यात मुंबईत सायबर गुन्हे वाढलेदेशाची आर्थिक राजधानी मुंबईत जानेवारी ते जून 2020 या काळात तब्बल 1057 सायबर गुन्हे घडले आहेत. संगणकाच्या सोर्स कोड संदर्भात छेडछाड करण्याच्या संदर्भात 1 गुन्हा नोंदविण्यात आला आहे. संगणक कार्यप्रणालीवर सायबर हल्ला होण्याच्या 4 घटना मुंबईत घडल्या आहेत. सायबर हॅकिंग, नायजेरियन फ्रॉड सारखे 19 गुन्हे या काळात घडले असून अश्लिल इमेल, एसएमएस, एमएमएस प्रकरणी 97 गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. सोशल माध्यमांवर बनावट प्रोफाइल बनवून बदनामी करण्याचे 15 गुन्हे घडले असून, क्रेडिट कार्ड फसवणूकीचे 256 गुन्हे सायबर पोलिसांकडे नोंदविण्यात आले आहेत. या बरोबरच इतर प्रकरणात 705 गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details