मुंबई - सुशांतसिंह आत्महत्या प्रकरण दररोज नवीन वळण घेत आहे. याप्रकरणी 8 जणांची एनसीबीकडून चौकशी सुरू असून आज रिया चक्रवर्तीला चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे. सुशांत आत्महत्या करूच शकत नाही, त्याची हत्या झाली असावी, असं त्याच्या चाहत्यांनी आणि कुटुंबीयांनी म्हटलं आहे. मुंबईतील साडेतीन वर्षीय नायशा पुनमिया ही आपल्या कुंटुंबीयांसह एनसीबी कार्यालयाबाहेर सुशांतला न्याय द्यावा, अशी मागणी करत आहे.
सुशांतला न्याय द्या; एनसीबी कार्यालयाबाहेर साडेतीन वर्षीय चिमुकलीचे आंदोलन
मुंबईतील साडेतीन वर्षीय नायशा पुनमिया ही आपल्या कुंटुंबीयांसह एनसीबी कार्यालयाबाहेर सुशांतला न्याय द्यावा, अशी मागणी करत आहे. सुशांतसिंह राजपूतने 14 जूनला त्यांच्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली होती. त्याच्या आत्महत्या प्रकरणाला दररोज वेगळे वळण लागत आहे.
पुनमिया कुटुंब हे मुंबईतील लालबाग परिसरात राहतात. सुशांतचे अनेक वर्षांपासून ते चाहते आहेत. सुशांतच्या निधनाने त्यांना फार दुःख झालेअसून सुशांत आत्महत्या करू शकत नाही. त्याची हत्या झालेली आहे, असे त्यांचं म्हणणं आहे.
सुशांत आम्हाला खूप आवडायचा. आम्ही त्याचे अनेक चित्रपट आणि मालिका पाहिल्या आहेत. त्याला न्याय मिळावा, यासाठी आम्ही इथे आलो आहोत, असे नायशा म्हणाली. दरम्यान, सुशांतसिंह राजपूतने 14 जूनला त्यांच्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली होती. त्यांच्या मृत्यूशी संबंधित असलेल्या अमलीपदार्थांच्या प्रकरणाच्या चौकशीसंदर्भात शनिवारी न्यायालयाने शोविक चक्रवर्ती आणि सॅम्युअल मिरांडा यांना 9 सप्टेंबरपर्यंत नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोच्या (एनसीबी) कोठडीत पाठवले आहे.