महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Wold Best School : जगातील शाळांच्या श्रेणीत महाराष्ट्राच्या तीन शाळा, नगरची एक मुंबईच्या दोन शाळांचा समावेश - Mumbai Public School

जागतिक सर्वोत्तम शाळा पुरस्कारामध्ये जगात दहा शाळा निवडण्यात आल्या. त्यापैकी आपल्या राज्यात तीन शाळा आहेत. या शाळांना अडीच लाख डॉलरचे बक्षीस देखील दिले जाणार आहे. तीनपैकी अहमदनगर या ठिकाणी एक तर मुंबईतील दोन अशा शाळांची निवड करण्यात आलेली आहे. यात ओबेरा इंटरनॅशनल स्कूल, स्नेहालय इंग्रजी माध्यमाची शाळा, मुंबई पब्लिक स्कूल या शाळांचा समावेश आहे.

Wold Best School
Wold Best School

By

Published : Jun 16, 2023, 6:00 PM IST

मुंबई :जागतिक क्रमवारीमध्ये सर्वोत्तम शाळांमध्ये ज्या 10 निवडल्या गेल्या त्यापैकी महाराष्ट्रातील तीन शाळांची निवड झालेली आहे. त्या तीनपैकी अहमदनगर या ठिकाणी एक तर मुंबईतील दोन अशा शाळांची निवड करण्यात आलेली आहे. मुंबईतील ओबेरा इंटरनॅशनल स्कूल, तर अहमदनगर येथील स्नेहालय इंग्रजी माध्यमाची शाळा, तर मुंबईतीलच शिंदेवाडी मुंबई पब्लिक स्कूल ही द आकांक्षा या एनजीओच्या वतीने चालवण्यात येणारी शाळा आहे.



कोणत्या निकषांवर शाळांची निवड ? :जागतिक 10 शाळांची उच्चतम श्रेणी निवडण्यासाठी काही पाच निकष यासाठी ठरवले गेलेले आहेत. यामध्ये पहिला निकष आहे. शाळेचा शाळेच्या परिसरात सोबत वागणे त्यातून मुलांना शिकण्यासाठीचे कृती कार्यक्रम करणे, तर दुसरा मुद्दा आहे शाळेने पर्यावरण संदर्भात मुलांना जागृती करणे. मुलं प्रत्यक्ष कृती करतील या संदर्भातील महत्त्वाचे उपक्रम कार्यक्रम, तर तिसरा निकष आहे. नवीन कल्पना विद्यार्थी आणि शिक्षक यांनी एकत्रित रीतीने मांडणे. तिच्यावर प्रत्यक्ष शाळेने विद्यार्थ्यांच्या पुढाकाराने कृती करणे. तर पुढचा निकष शाळेला ज्या आव्हानात्मक बाबी आहेत किंवा प्रतिकूल गोष्टी आहेत त्याच्यावर शाळा कशी मात करते. निरोगी जीवनासाठी शाळा नेमकं काय उपक्रम राबवते. जेणेकरून मुलं त्या दृष्टीने काय कृतीशील उपक्रम करतात असे विविध निकष असतात.

टी फॉर एज्युकेशन प्लॅटफॉर्मने घेतला पुढाकार :संयुक्त राष्ट्र संघाच्या मदतीने आणि त्यांच्या शाश्वत विकासाच्या उद्दिष्टाच्या आधारे गेल्या काही वर्षापासून जागतिक उच्च श्रेणीमध्ये काही शाळा निवडण्याची प्रक्रिया सुरू केली गेलेली आहे. ज्यामध्ये शिक्षणाशी संबंधित तसेच कोरोना महामारीच्या आधी जी शाळांनी प्रगती केली होती. त्यामध्ये खंड पडला. म्हणून त्यानंतर लोकांसोबत शाळेचे वागणे कसे आहे. त्यातून वंचित क्षेत्रामध्ये आणि वंचित जनतेला विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी खास करून प्रयत्न करणे, मुलींना त्यांचे हक्क मिळवून देणे, समाजात देशाची भावना नष्ट करणे, आणि प्रेम सद्भाव सहिष्णुता वाढवणे या उद्दिष्टासाठी संयुक्त राष्ट्र संघाच्या मदतीने शाळांची निवड केली जाते.

"कोरोना महामारीनंतर विशेष करून हे पुरस्कार देण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे .देशाच्या आणि विषमतेच्या वातावरणात प्रेम आणि सद्भाव तसेच पर्यावरण आणि वंचित क्षेत्रातील मुलांचा विकास या निमित्ताने जर पुढे येत असेल तर ती आनंदाची बाब आहे."- सुभाष मोरे, राज्य कार्यवाह शिक्षक भारती

मल्टिनॅशनल कंपन्यांच्या सोबत शिक्षणामधील कामगिरी सुधारण्यासाठी सहकार्य करण्यात येते. टी फोर एज्युकेशन हा प्लॅटफॉर्म या प्रकारच्या शाळांची निवड करण्यासाठी पुढाकार घेतो. त्यामध्ये मल्टिनॅशनल कंपन्यांमध्ये ॲक्शनचअर, लेमन, अमेरिकन एक्सप्रेस, यायासन हसनाह, मेलिबि ग्रँड अशा मल्टिनॅशनल कंपन्यांचा सहभाग आहे.

हेही वाचा -Schools Open : नाशिकमध्ये घोड्यावरुन मुलांचा पहिल्या दिवशी शाळेत प्रवेश, आजपासून राज्यात बहुतांश ठिकाणी शाळा सुरू

ABOUT THE AUTHOR

...view details