मुंबई -चेंबूरच्या अमर महाल पुलावर रिक्षाचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली. रीक्षाला डंपरने धडक दिल्याने रीक्षा खसगी बसच्या पाठीमागे घुसून हा अपघात झाला. यामध्ये 2 ते 3 लोक जखमी झाले असून, त्यांना रिक्षाच्या बाहेर काढण्याचे प्रयत्न चालू आहेत.
मुंबईत विचित्र अपघात; रिक्षा घुसली बसमध्ये, 2 ते 3 जण गंभीर - chembur
अमर महाल पुलावर रिक्षाचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली. रीक्षाला डंपरने धडक दिल्याने रीक्षा खसगी बसच्या पाठीमागे घुसून हा अपघात झाला. यामध्ये 2 ते 3 लोक जखमी झाले आहेत.
रिक्षाला पाठीमागून डंपरने जोराची धडक दिली यात रिक्षा समोरील खासगी प्रवाशी वाहतूक करणाऱ्या बसमध्ये घुसली. यामध्ये 2 ते ३ प्रवाशी अडकले असून, त्यांचे अर्धे शरीर बसखाली होते. तर रिक्षा चालक प्रतिसाद देत नसल्याने रिक्षा चालक चिंताजनक असल्याचे बोलले जात आहे. डंपर चालक घटनास्थळावरून पळून गेला असून, रिक्षात अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचा प्रयत्न स्थानीक नागरिक करत आहेत.
शनिवारी रात्रीच विक्रोळी पार्क साईट येथे रस्त्याच्या कडेला झोपलेल्या 3 लोकांना टँकरने चिरडले होते. तर दिवसा शिवडी येथे भरधाव वेगात असलेल्या कारने बस थांब्यावरच्या 6 लोकांना उडवले होते. यात एकाने जीव गमवला होता. हे अपाघात ताजे असतानाच रात्री चेंबूरच्या अमर महाल पुलावर हा अपघात झाला.