महाराष्ट्र

maharashtra

मुंबई : एनसीबीची छापेमारी; 3 जणांना अटक

By

Published : Apr 21, 2021, 8:03 PM IST

नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने केलेल्या छापेमारी दरम्यान कॅमरून देशाचे नागरिकत्व असलेल्या अमली पदार्थ तस्कराला अटक करीत फरार आरोपींच्या यादीत असलेला साबिर शौकत अली यास अटक करण्यात आलेली आहे.

Ncb mumbai raid
एनसीबी मुंबई बातमी

मुंबई -नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या पथकाकडून मीरा भाईंदरच्या वेगवेगळ्या परिसरात छापे टाकण्यात आलेे. या कारवाई दरम्यान मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहे. तसेच तीन आरोपींना अटक करण्यात आलेली आहे.

नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने केलेल्या छापेमारी दरम्यान कॅमरून देशाचे नागरिकत्व असलेल्या अमली पदार्थ तस्कराला अटक करीत फरार आरोपींच्या यादीत असलेला साबिर शौकत अली यास अटक करण्यात आलेली आहे. अटक केलेल्या आरोपींकडून 20 एसकेटी या अमली पदार्थाच्या 20 गोळ्या जप्त करण्यात आलेल्या आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात त्यांची किंमत 9 लाख 25 हजार रुपये इतकी आहे.

फिश ऑक्सिजन पाईपमध्ये गांजा लपवून कतारला पाठविण्याचा प्रयत्न -

नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या पथकाकडून साबिर शौकत अली या अमली पदार्थ तस्कराचा शोध घेतला जात असताना अरामेक्स कुरिअर सर्व्हिसच्या माध्यमातून मीरा-भाईंदर येथून एका फिश एक्वेरियम ऑक्सिजनच्या पाइपमध्ये लपवलेले 5 किलो गांजा हस्तगत केले आहे. सदरचे हे अमली पदार्थ कुरियरच्या माध्यमातून कतार येथे पाठवण्याचा प्रयत्न केला जात होता. अटक आरोपी साबिर शौकत अली याने सदर हे पार्सल कतारमधील अब्दुल हमिद या व्यक्तीच्या नावाने पाठवले होते .

या अगोदरही झाली आहे कारवाई -

अटक आरोपी साबिर शौकत अली हा सवयीचा आरोपी असून या अगोदर 10 किलो चरसच्या प्रकरणांमध्ये नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोकडून त्यास अटक करण्यात आली होती. या बरोबरच दिल्ली एनसीबीच्या पथकाकडून 335 ग्राम हेरॉईनच्या संदर्भातसुद्धा त्यास अटक करण्यात आली होती. सध्या तो जामिनावर सुटून बाहेर आल्यानंतर त्याने पुन्हा अमली पदार्थ तस्करी करण्यास सुरुवात केली होती.

ABOUT THE AUTHOR

...view details