महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मुख्यमंत्र्यांच्या चाणक्य नितीचा पवारांना धक्का, शिवेंद्रराजे, वैभव पिचड, संदिप नाईकांच्या हातात कमळ

भाजप प्रवेशाच्या वाटेवर असलेल्या राष्ट्रवादीच्या ३ तर काँग्रेसच्या एका आमदाराने आज अखेर हातात कमळ घेतले. कुंपनावर असलेल्या राष्ट्रवादीच्या आमदारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला.

By

Published : Jul 31, 2019, 11:06 AM IST

Updated : Jul 31, 2019, 1:42 PM IST

शिवेंद्रराजे, वैभव पिचड, संदिप नाईकांच्या हातात कमळ

मुंबई - भाजप प्रवेशाच्या वाटेवर असलेल्या राष्ट्रवादीच्या ३ तर काँग्रेसच्या एका आमदाराने आज अखेर हातात कमळ घेतले. कुंपनावर असलेल्या राष्ट्रवादीच्या आमदारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. हा राष्ट्रवादी काँग्रेसला आणि काँग्रेसला मोठा धक्का मानला जातो.

साताऱ्याचे आमदार शिवेंद्रराजे भोसले, अकोल्याचे आमदार वैभव पिचड आणि नवी मुंबईचे संदिप नाईक, काँग्रेसचे आमदार कालीदास कोळंबकर, राष्ट्रवादीच्या माजी महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, माजी मंत्री मधुकरराव पिचड यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

शिवेंद्रराजे, वैभव पिचड, संदिप नाईकांच्या हातात कमळ

छत्रपतींचे वंशज आमच्यासोबत येत आहेत हा भाजपचा सन्मान
सातारा-जावळीचे राष्ट्रवादीचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला. ते छत्रपती शिवाजी महारांचे वंशज आहेत. त्यांचा भाजप प्रवेश म्हणजे भाजपचा सन्मान असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

वैभव पिचड म्हणजे मधुकर पिचड यांची कार्बन कॉपी
वैभव पिचड म्हणजे माजी मंत्री मधुकर पिचड यांची कार्बन कॉपी असल्याचे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. वैभव पिचड हे संयमी, प्रश्नांची जाण असणारे नेते आहेत. मधुकरराव पिचड भाजपमध्ये आल्याने पक्षाची ताकद वाढल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

कोळंबळकर म्हणजे जनतेचा माणूस
कालीदास कोळंबकर हा जनतेचा माणूस आहे. ते भाजपमध्ये येत आहेत. त्यांचे आम्ही स्वागत करत असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. सामान्य जनतेची सेवा करणारा सामान्य माणूस म्हणजे कोळंबकर आहेत.

प्रश्नांची जाण असणारा नेता म्हणजे संदिप नाईक
संयमी, प्रश्नांची जाण असलेले नवी मुंबईचे युवा नेते म्हणजे संदिप नाईक असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. ते भाजपमध्ये आल्याने नवी मुंबईत आता राहिले असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. त्यांना गणेश नाईक यांचे आशीर्वाद त्यांनी मिळाले, ते जरी मंचावर नसले तरी आम्हाला काही अडचण नसल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

पवारांना चित्रा ताईंवर बोलावे लागले
संघर्ष करुन सामान्यांना न्याय मिळवून देणारे नेतृत्व म्हणजे चित्राताई वाघ असल्याचे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. त्यांच्यावर खुद्द राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना बोलावे लागले. त्यांची ताकद मोठी असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

Last Updated : Jul 31, 2019, 1:42 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details