महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

स्वच्छता कर्मचाऱ्यांना तीन महिन्याची मुदतवाढ; राज्य शासनाचा निर्णय - स्वच्छता कर्मचाऱ्यांना तीन महिन्याची मुदतवाढ

२० डिसेंबर २०१८ च्या शासन निर्णयानुसार ग्रामीण भागात नियुक्त करण्यात येणार्‍या स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीला मुदतवाढ मिळावी अशी मागणी, पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाने केली होती. राज्य शासनाने याला मान्यता दिल्याने ३० मार्च २०२१ पर्यंत स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या होत्या. ही मुदत संपल्याने ३१ जून २०२१ पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय नुकताच घेण्यात आला आहे.

मंत्रालय
मंत्रालय

By

Published : Mar 30, 2021, 9:18 PM IST

मुंबई - कोविडच्या प्रतिकारासाठी स्वच्छता हा महत्त्वाचा घटक आहे. त्याचा प्रचार - प्रसारासाठी पाणीपुरवठा व स्वच्छता विभागामार्फत नियुक्त केलेल्या राज्यातील स्वच्छता कर्मचाऱ्यांना तीन महिन्यांची मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे अशी माहिती पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली आहे.

गेल्या वर्षभरापासून कोविड-१९ विषाणूचा संसर्ग वाढतो आहे. यातील एक सर्वात महत्वाचा घटक हा स्वच्छतेशी संबंधित आहे. यामुळे २० डिसेंबर २०१८ च्या शासन निर्णयानुसार ग्रामीण भागात नियुक्त करण्यात येणार्‍या स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीला मुदतवाढ मिळावी अशी मागणी, पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाने केली होती. राज्य शासनाने याला मान्यता दिल्याने ३० मार्च २०२१ पर्यंत स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या होत्या. ही मुदत संपल्याने ३१ जून २०२१ पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय नुकताच घेण्यात आला आहे. राज्यातील २७ जिल्ह्यांमधील स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीलाही मुदतवाढ दिल्याचे गुलाबराव पाटील यांनी सांगितले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details