मुंबई- पश्चिम उपनगरांमध्ये सकाळपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. अशात दुपारी 2 च्या सुमारास जोगेश्वरी मेघवाडी भागातील 2 मजली इमारत कोसळली. यात दोन महिला आणि एक पुरुष किरकोळ जखमी झाले आहेत. स्थानिकांच्या मदतीने त्यांना कूपर रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली आहे.
मुसळधार पावसाने जोगेश्वरीत इमारत कोसळली, तिघे किरकोळ जखमी
सकिरा शेख (वय 22), तौसीफ शेख (वय 28), फातिमा कुरेशी (वय 60) अशी किरकोळ जखमी झालेल्यांची नावे आहेत. त्यांना स्थानिकांनी तातडीने कूपर रुग्णालयात दाखल केले. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल, पालिका अधिकारी आणि पोलीस घटनास्थळी पोहोचले.

याशिवाय आज दुपारी 12 च्या सुमारास झालेल्या पावसाने कुर्ला येथील एका इमारतीचा भागही कोसळला. कुर्ला स्टेशन रोड भागात नेताब ही तीन मजली जुनी इमारत होती. या इमारतीचा भाग कोसळला. दिलासादायक बाब म्हणजे यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. पालिकेने ही इमारत आधीच अतिधोकादायक म्हणून घोषित केली आहे.