मुंबई : कोविड नंतर मुंबईत प्रथमच मुंबई मॅरेथॉन झाले. औरंगाबादच्या वैजापूर तालुक्यातील अनेक मुली या मॅरेथॉनमध्ये धावल्या. खेडेगावातून आलेल्या या मुलींनी मुंबईकरांचा अक्षरशः दम काढला. २१ आणि १० किलोमीटरच्या स्पर्धेत शीतल जाधव आणि अमृता गायकवाड यांनी अनुक्रमे दोन आणि तीन क्रमांक पटकावला. तर गीतांजली भोसले हिने टॉप टेनमध्ये ५ वा क्रमांक मिळवला. अवघ्या ४५ मिनिटांत तिने हे अंतर पार केले.
पहिल्याच मॅरेथॉनमध्ये दुसरा आणि तिसरा क्रमांक औरंगाबादचा :पहिल्यांदा स्पर्धेत भाग घेतला. शाळेच्या मैदानात आणि मुंबईत धावताना वेगळीच मजा आली. खेडेगावात अशा सोयीसुविधा नाहीत, असे शीतल जाधव हिने सांगितले. तर अमृता गायकवाड हिने माझी पहिलीच मेरेथॉन होती. थोडं दडपण होतं, मात्र पाळयला सुरूवात केल्यावर मागे वळून पाहिले नाही. मला आज तिसरा क्रमांक मिळाला. यापूर्वी मोठ्या बहिणीने पहिला क्रमांक मिळवला आहे. आज मलाही पारितोषिक मिळणार असल्याने खूप आनंद होतो आहे, असे अमृता गायकवाड हिने सांगितले. शीतल जाधव हिला ५ व्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. भविष्यात हे अंतर कमी वेळेत अजून कसे कापता येईल, यासाठी प्रयत्न करणार असल्याचे ती म्हणाली.
खेडेगावातील छोट्याशा मैदानावर सराव :औरंगाबादमधील वैजापूर तालुक्यातील बाबुळगाव येथील आतापर्यंत अनेक मुली या मॅरेथॉनमध्ये धावत होत्या. सगळी शेतकऱ्यांची मुले असून; शाळेतल्या छोट्याशा मैदानावर सराव करतात. कोणत्या ही प्रकारच्या सुविधा नाहीत. तरीही या मुली शेकडो किलोमीटर पर्यंतचे अंतर पार करत आहेत. यात दिपाली तुपे नावाची मुलगी पहिली आली असून; बेस्ट ऑफ टेन मध्ये तिचा नंबर येईल. १० किलोमीटरमध्ये शितल जाधव, अमृता गायकवाड यांनी अनुक्रमे २ आणि ३ तर, गीतांजली भोसले हिने पाचवा क्रमांक मिळवला आहे, असे मार्गदर्शक आणि शाळेत क्रीडा शिक्षक म्हणून गेल्या 32 वर्षांपासून कार्य करणारे सतीश पाटील यांनी सांगितले.