महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

डॉ. पायल तडवी आत्महत्याप्रकरणी तिन्ही महिला डॉक्टरांना अटक - doctor

वैद्यकीय विद्यार्थींनी डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरणातील तिन्ही आरोपी डॉक्टरांना अटक करण्यात आली आहे. याआधी डॉ. भक्ती मेहरे, डॉ. हेमा आहुजा या दोन डॉक्टरांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर आता डॉ. अंकिता खंडेलवालला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे.

डॉ. पायल तडवी आत्महत्याप्रकरणी तिन्ही महिला डॉक्टरांना अटक

By

Published : May 28, 2019, 11:36 PM IST

Updated : May 29, 2019, 10:45 AM IST

मुंबई -वैद्यकीय विद्यार्थिंनी डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरणातील तिन्ही आरोपी डॉक्टरांना अटक करण्यात आली आहे. याआधी डॉ. भक्ती मेहरे, डॉ. हेमा आहुजा या दोन डॉक्टरांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर आता डॉ. अंकिता खंडेलवालला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. आज तिन्ही आरोपींना न्यायालयात हजर करण्यात येण्याची दाट शक्यता आहे. याप्रकरणी नायर रुग्णालयाच्या स्त्रीरोग विभागाच्या प्रमुखांना निलंबित करण्यात आले आहे.

डॉ. पायल तडवी नायर रुग्णालयात वैद्यकीय शिक्षण घेत होती. गेल्या २२ तारखेला रुग्णालयाच्या परिसरातच तिने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. रुग्णालयातील ३ वरिष्ठ डॉक्टरांनी जातीयवादी टीका करून पायलचे रॅगिंग केल्याचा आरोप पायल यांच्या कुटुंबीयांनी केला होता.

त्यामुळे याप्रकरणी डॉ. हेमा अहुजा, डॉ. भक्ती मेहरे आणि डॉ. अंकिता खंडेलवाल या तिघींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाची कसून चौकशी करून आरोपीला अटक करण्याची मागणी अनेक विद्यार्थी संघटनाकडून करण्यात येत आहे.

Last Updated : May 29, 2019, 10:45 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details