मुंबई :सध्या पाऊस सुरू आहे. त्यामुळे पाण्याची पातळी वाढली आहे. परिसर अगदी निसर्गरम्य झाले आहेत. त्यामुळे फिरण्यासाठी पर्यटनस्थळी म्हणजेच धबधबे, बीचवर पर्यटकांची मोठी गर्दी दिसून येते. अनेकदाहे पर्यटन महागात पडल्याचे दिसते. नुकतेच मुंबई व चंद्रपूर जिल्ह्यातील दोन घटना समोर आल्या आहेत. ज्यामध्ये फिरायला गेलेल्या सातपैकी तीन मुलांचा बुडून मृत्यू झाल्याचा संशय वर्तविण्यात येत आहे.
पोहताना पाण्यात बुडाले : महाराष्ट्रातील मुंबई आणि चंद्रपूर जिल्ह्यातील अधिकाऱ्यांनी सांगितले की, मुंबईतील मालाड उपनगरातील मार्वे खाडीत पाच अल्पवयीन मुले रविवारी सकाळी पोहायला गेली होती. ते पोहताना पाण्यात बुडाले होते. त्यापैकी दोघांना वाचवण्यात आले, तर इतर तीन बेपत्ता झाले आहेत. अग्निशमन दलाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, रात्रीपर्यंत तिघांचा शोध लागलेला नाही. समुद्राची खोली लक्षात न आल्यामुळे हे मुले बुडाले असल्याचा अंदाज आहे.
शोध मोहीम सुरू : पूर्व महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यात पिकनिकचा आनंद लुटत असताना चार मुले घोडाझेरी तलावात पडले. ही घटना रविवारी दुपारी साडेचारच्या सुमारास घडली, असे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. पोलीस आणि आपत्ती व्यवस्थापनाच्या पथकांनी 17 वर्षांच्या मुलासह चार जणांचा शोध घेण्यासाठी शोध मोहीम सुरू केली. अधिकारी म्हणाले की, परिसरात पावसामुळे तलावातील पाण्याची पातळी वाढली आहे.
शोध मोहिमेत हेलिकॉप्टरचाही सहभाग : खराब हवामानामुळे रविवारी रात्री शोध मोहीम थांबवण्यात आली होती. मुंबईतील मार्वे येथे 13 आणि 16 वर्षे वयोगटातील पाच मुलांपैकी दोन मुलांना अग्निशमन दल येण्यापूर्वी काही लोकांनी खाडीतून वाचवले होते, असे अधिकारी म्हणाले. मुंबई अग्निशमन दलाचे कर्मचारी, पोलीस, तटरक्षक दल, नौदलाचे गोताखोर, वॉर्ड कर्मचारी आणि एक रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाली, असे अधिकाऱ्याने सांगितले. शोध मोहिमेत हेलिकॉप्टरचाही सहभाग होता, तो संध्याकाळी मागे घेण्यात आला.
हेही वाचा :
- Mumbai Drowning News : मालाड मार्वे बीचवर पोहायला गेलेले ५ मुले बुडाली; दोघांची सुटका, तिघांचा शोध सुरू
- Nagpur drown death: पोहण्याचा मोह आला अंगलट, मोहगाव झिल्पी तलावात बुडून ५ तरुणाचा मृत्यू
- Nanded Accident News: वर्ग मित्रांची भेट ठरली शेवटची, गोदावरी नदीत आयटीआयच्या दोन विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू