मुंबई -ईस्टर्न फ्रि-वेवर तिघांनी एका 15 वर्षीय मुलीचे अपहरण करून तिच्यावर आळीपाळीने चालत्या गाडीत लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आली. २९ जुलैला हा धक्कादायक प्रकार घडला आहे. या प्रकरणी पोलिसांनी पॉक्सो कायद्या अंतर्गत तीन आरोपींना अटक केली आहे.
चालत्या गाडीत अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; तिघांना अटक - मुंबई अल्पवयीन लैंगिक अत्याचार
मुंबईत चालत्या गाडीत एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याचा प्रकार समोर आला. ईस्टर्न फ्रि-वेवर २९ जुलैला ही घटना घडली होती. या प्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे.
लैंगिक अत्याचार
अत्याचार केल्यानंतर हे तीन आरोपी मुलीला फ्री वेवर उतरवून फरार झाले होते. घाबरलेल्या मुलीने घरी येऊन घडलेला प्रसंग तिच्या कुटुंबियांना सांगितला. त्यांनी जवळच्या पोलीस ठाण्यात लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल केला होता. पोलिसांनी फ्री वेवर लावलेल्या सीसीटीव्हीचा तपास करून तिन्ही आरोपींना अटक केली. यातील एक आरोपी इलेक्ट्रिशियन, एक वाहन चालक तर एक आरोपी बेरोजगार आहे.